दहीहंडी व गोपालकाल्याने यात्रा उत्सवात आस्थेचा जल्लोष…

0
1348
Google search engine
Google search engine

शहरातील विविध भागातील दिंडी पालख्यांची अभूतपूर्व गर्दी…

अकोट/ संतोष विणके

अकोट नगरीचे ग्रामदैवत संत श्री नरसिंग महाराज यात्रा उत्सव दिनांक 24 पासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज मंदिर परिसरात दहीहंडी गोपालकाला उत्सव जल्लोषात संपन्न झाला दहीहंडी उत्सव मुळे शहरात नवचैतन्य पसरले असून यात्रा चौक,गवळी पुरा चौक,विर सावरकर चौक, नरसिंग मंदिर मार्ग हा प्रचंड गर्दीने फुलून गेला होता.

दरवर्षी प्रमाणे शहरातील विविध भागातून गोपाळकाला दहीहंडीसाठी शहरातील विविध भागातुन आलेल्या दिंडी पालख्यांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. तत्पुर्वी नरसिंग महाराज व मिया साहेबांची पालखी ही नगरप्रदक्षिणा पूर्ण करून दुपारी चार वाजता मंदिरात पोहचली. यानंतर संस्थांनचे अध्यक्ष सतिश आसरकर हभप सुभाष बुवा वर्मा यांच्या उपस्थितीत काल्याचे किर्तन पार पडले

त्यासोबतच बाहेरून आलेल्या विविध दिंड्या यांचे काल्याचे किर्तन पार पडले.गोपालकाला पार पाडण्यात आल्यानंतर दिंडेकऱ्यांनी भाविकांना गोपाळकाल्याचे वाटप केले. तर यावेळी भक्तांनी नरसिंग महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तर यात्रा परिसर हा खेळ भांडे गृहपयोगी वस्तू जाते पाटे लाह्या फुटाणे प्रसादाची दुकाने आदींवर भाविकांची एकच गर्दी झाली होती.

उत्सवासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शहर ठाणेदार गजानन शेळके यांच्या उपस्थितीत पि एस आय आशिष शिंदे,पिएसआय सोळंके, पि एस आय मुंडे , ए एस आय रणजीत खेडकर,हेड कॉन्स्टेबल विलास मिसाळ, वाघ,सचिन सोनटक्के,वाहतुक शाखेचे अनिल लापुरकर यांच्या महीला कर्मचारी व ,इतर कर्मचारी झटत होते

.गोपालकाला व दहीहांडीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.यात्रा उत्सव हा दि ५ डीसेंबर पर्यत साजरा होणारा असुन त्यानंतर साधारण ४ आठवडे नरसिंग महाराजांची यात्रा असणार आहे.

सकाळी नगर परीक्रमेत पालखिचे ठीकठीकाणी हार फुल पुष्प वर्षावात फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आला.मार्गावर दिंडीतील वारकरींना चहा पानी फराळाचे वितरण करण्यात आले.