कसबे तडवळा येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमा भेट ; मोरे फौंडेशनचा अनोखा उपक्रम

0
697
Google search engine
Google search engine

कसबे तडवळा येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमा भेट ; मोरे फौंडेशनचा अनोखा उपक्रम

उस्मानाबाद, दि. 28- तालुक्यातील कसबे तडवळे येथे देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचीत्य साधून गावातील विविध शाळांना महात्मा फुले यांच्या प्रतिमा भेट देवून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेल्या देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने जिल्ह्यात अन्य संस्था, दानशूर व्यक्तींना प्रेरणादायी असे काम केले आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यावर तत्काळ तोडगा काढून अडचणी दूर करण्यासाठी फौंडेशनच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी मोरे फौंडेशनच्यावतीने महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळांना प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी फौंडेशनचे सदस्य प्रशांत भालशंकर, पद्म चौगुले, भागवत शिंदे, अरुण निकम, विकास उबाळे, विजय पवार आदी उपस्थित होते.