उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते कबड्डी सराव शिबीराचे उद्घाटन

0
746

उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते कबड्डी सराव शिबीराचे उद्घाटन

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद – जवाहर माध्यमिक आश्रम शाळा व उस्मानाबाद जिल्हा कब्बडी आसोशियशनच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कब्बडी स्पर्धेच्या सराव शिबीराचे रविवारी (दि२)प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य कब्बडी आशोसियशनचे सचीव महादेव साठे,सहसचीव बबन लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य कब्बडी असोशियशनच्या वतीने सात ते दहा डिसेंबर दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातुन मुलांचा आणि मुलींचा प्रत्येकी एक संघ सहभागी होणार आहे.या दोन्ही संघातील खेळाडुंना देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने कब्बडीचे कीट देण्यात आलेले आहे.यातील मुलांच्या संघाचे सराव शिबीर उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील आश्रम शाळेवर होत आहे.त्या शिबीराचे रविवारी उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे सचीव दयानंद राठोड, शहाजी वाघ,आदेश मोरे,प्रा.जगदिश गवळी,ज्ञानेश्वर पतंगे,दलीतमित्र प्रशांत भालशंकर,लक्ष्मण मोहिते,रमेश आडे,विनायक लोकरे व क्रिडाप्रेमी उपस्थित होते.