*द पॉवर ऑफ मीडियाची कडेगाव तालुका कार्यकारणी घोषित-तालुका अध्यक्ष सदानंद माळी तर उपाअध्यक्ष पदी सचिन सूर्यवंशी याची निवड*

376

कडेगांव :-
लोकशाही चा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेला पत्रकार बांधव याना अनेक समस्या ना सामोरे जावे लागते.पत्रकार हा आपला स्वतःसाठी कमी तर इतरांसाठी अविरत झटत असतो. त्यामुळे पत्रकार यांनी आपल्या स्वतःसाठी ही जगणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य
द पॉवर मीडियाचे कडेगाव तालुका अध्यक्ष सदानंद माळी यांनी केले. ते कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित सभे दरम्यान बोलत होते
पावर ऑफ मीडिया ही संघटना महाराष्ट्र च नवे तर संपूर्ण देशात संपादक ,पत्रकार,वृत्तवाहिनी,साहित्यिक,लेखक,कवी,वृत्तपत्र वितरक,व्यगचित्रकार,छायाचित्रकार,जाहिरातदार ,वार्ताहर ,बातमीदार याची एकमेव राष्ट्रव्यापी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेली संघटना सर्वांना हक्कासाठी लढा देणार असल्याचे माहिती संघटनेचे संस्थापक सदस्य कुलभुषण महाजन यांनी दिली.

दुपारी ३ वाजता जिल्हा कार्याध्यक्षअमित डोळ यांच्या नेतृत्वाखाली सभेला सुरुवात झाली. या सभेला मार्गदर्शक म्हणून संस्थापक सदस्य कुलभूषण महाजन ,जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण नलवडे उपस्थित होते.तसेच सभेचे अध्यक्ष म्हणून सदानंद माळी यांचा पावर ऑफ मीडिया च्या पदा अधिकारी यांच्या वतिने शाल,श्रीफल व बुके देऊन सत्कार करण्यात आला त्यांनतर खलील प्रमाणेतालुका कार्यकारनी घोषित करण्यात आली
सचिन सूर्यवंशी तालुका उपध्यक्ष,प्रमोद मांडवे तालुका कार्याध्यक्ष, राजेश महाडिक तालुका सचिव, अश्विनी खलिपे यांची सांगली जिल्हा महीला कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर काजल हावलदार यांची कडेगांव महीला तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सचिन मोहिते, हेमंत व्यास, रोहित घोरपडे तालुका कार्यकारणी सदस्य
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी याचे अभिनंदन आणि तसेच पुढील वाटचालीस सर्व पदाधिकारी, सदस्य, प्रतिनिधी याना शुभेच्छा. मान्यवर याच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि गुलाब पुष्प देण्यात आले. तर सभेदरम्यान घोषित करण्यात आलेल्या सदस्य याच नियुक्ती बाबत चे निर्णय सांगली जिल्हा कोरकमिटी ने स्वतःकडे राखून ठेवली असल्याची माहिती सस्थापक सदस्य कुलभूषण महाजन यांनी दिली.