आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते गोवर-रुबेला लसीकरणाचे उदघाटन

465
जाहिरात

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते गोवर-रुबेला लसीकरणाचे उदघाटन

मणिष सोनी/उमरगा

उमरगा : आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते आज गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने व इतर सर्व विभागाच्या मदतीने उमरगा-लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावागावात नोव्हेंबर 2018 पासून मिझेल्स रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून या एका लसीमुळे मिझल्स व रुबेला या दोन महाभयंकर आजारापासून संरक्षण मिळणार आहे.
ही लस आरोग्य विभागार्फत मोफत दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेचा इ-लर्निंग इंग्लिश स्कुल, उमरगा येथे आमदार चौगुले यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला.यवेळी तहसीलदार संजय पवार, उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुशील चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, विलास भगत आदी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।