देवदत मोरे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार

0
660
Google search engine
Google search engine

देवदत मोरे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले सामाजिक कार्यगौरव अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक देवदत्तजी मोरे यांना प्रदान करण्यात आला .मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे 27 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी पुणे या ठिकाणी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते .यावेळी श्री मोरे यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आज तडवळा येथे मोरे यांना हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या हस्ते देण्यात आला .यावेळी जि.प. सदस्य नानासाहेब वाघ , देवदत मोरे फाऊंडेशनचे सचिव राजेश पवार , प्रा जगदीश गवळी , गोपाळ उबाळे , अविराज सुरवसे , प्रशांत भालशंकर , संदीप इंगळे , बंटी मुंडे ,अक्षय पडवळ , मनोज पवार आदी उपस्थित होते . पुरस्काराचे हे ११वे वर्ष होते . जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक आशुतोष पाटील यांना पत्रकारितेचा तर तुझ्यात जीव रंगला फेम राणदा हार्दिक जोशी यांना कला क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला .