शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केले संविधान वाचन

0
931
Google search engine
Google search engine

शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केले संविधान वाचन

मणिष सोनी / उमरगा

जगातल्या सर्व देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास करून भारतासारख्या भाषिक वैविध्यता असेलल्या देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केले. जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधानाचा मान भारतीय संविधानाला मिळतो. अशा संविधानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी त्यासाठी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे प्रकट वाचन प्रा. एस. इ. बिराजदार, राज्यशास्त्र विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांसमवेत केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी संविधान सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयात व तसेच नागरिकांना नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये त्यांना कळावेत यासाठी समाजामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम या विभागाच्या वतीने घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २७ डिसेंबर रोजी संविधान वाचन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव , उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य प्रा. डी. वी. थोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. एन. गायकवाड, डॉ. अनिल देशमुख, प्रा. दिलीप चव्हाण, प्रा. एस. ए. कुंभार, आदि उपस्थित होते.