होर्टी येथे शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ

0
786

होर्टी येथे शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयानिमित्त होर्टी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणातील आलेल्या भविकामुळे गावाची शोभा वाढली आहे

होर्टी येथे दि 28 नोव्हेम्बर पासून श्री शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव सुरू आहे. या महोत्सव निमित्त श्री ची महापूजा ,काकडा आरती,चक्री भजन,हरिपाठ ,कीर्तन ,हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
महोत्सवात श्री हरिभक्त नितीन जगताप महाराज हे आपल्या अमृतवाणीने श्रीमद भागवत कथेचे वाचन करत आहेत. यासोबत होर्टीचे सोमनाथ राजमाने,तुळजापूरचे श्री पांडुरंग रेड्डी, उस्मानाबादचे श्री पांडुरंग लोमटे ,चिकुंदराचे श्री राम गायकवाड, तसेच आप्पा महाराज दिंडेगावकर, श्री विरपक्ष आप्पा वैरागकर यांनीही कीर्तनातून भाविकांनी मार्गदर्शन करत केले

आयोजित महोत्सवात विविध गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावली असून यात चिमुकलयांचाही मोठा सहभाग दिसत आहे
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील गावातील दानशूर व्यक्तींनी भाविकांसाठी अन्नदान आणि चहा नाष्टाचे सोय करत आहेत या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी मंदिर कमिटीचे पदाधिकारी,सदस्य त्याचप्रमाणे

ग्रामस्थानी पुढाकार घेतले आहेत .
मंगळवारी दि 4 डिसेंम्बर रोजी विविध कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे