अकोट शिवसेनेेची जीवन प्राधिकरण कार्यालयावर निवेदन रॅली….

0
1100
Google search engine
Google search engine

अकोट / प्रतीनीधी

शिवसेनेच्या वतीने अकोट शहरातील विविध पाणी समस्यांबाबत अकोट जीवन प्राधिकरण विभागाला काल दि.३ डीसे. निवेदन देण्यात आले.विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते,संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत
आ.गोपिकीशन बाजोरिया,
सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख,मा.आ.संजय गावंडे,महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,
प्रा.सौ.मायाताई म्हैसने मॅडम,
विधानसभा संपर्क प्रमुख भास्करजी ठाकूर,युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गटनेता तथा पाणीपुरवठा सभापती अभिजित उर्फ मनिष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

शहरातील नागरीकांना २००६ ते २०१६ या वर्षात जे पाणी बिल नळातून पाणी आलेच नाही तरी देण्यात आले ते लाखो रुपयांचे बिले व्याजासहित सर्वसामान्य जनतेवर लादण्यात आले आहे.हे बिल नागरिकांनी का भरावे?या विरोधात शिवसेना जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आकोट शिवसेना ही शहरातील नागरीकांच्या पाठीशी उभी आहे.तसेच आजही अनेक भागात जिवण प्राधीकरणाच्या पाईपलाईन नाहीत यासाठी निधी नाही त्यामुळे या भागातील नागरीकांना दररोज पाणी समस्या होत आहे.याला जबाबदार कोण हे जिवण प्राधीकरणाच्या अधीकार्‍यांनी स्पष्ट करावे आज रोजी शहरातील नागरीकांकडे पाणी बिगर मशिनचे येत नसल्यामुळे मिटर नाही त्यामुळे मिटर रिडींग घेतल्या जात नाही

.तरी बेहिशेबी मनमानी पध्दतीने नागरीकांना अव्याढव्य पाण्याचे बिल देण्यात येते.आपण जसे मिटर असणार्‍यांना बिल देता तसे सर्व नागरीकांना एकच रेटमधे बिल देण्यात यावे.कारण पुढे मार्च अखेरीस जिवन प्राधीकरणाची वसुली सुरु होईल त्यामध्ये आधीच जिवन प्राधीकरणाने शहरातील नागरीकांना वसुलीच्या नोटीस बजावल्या आहेत की बिल भरले नाही त पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल.पण लाखोचे बिल आज तरी नागरीकांना भरणे शक्य नाही यामुळे जिवन प्राधीकरण अधीकारी व नागरीकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. हे होवू नये व शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आह

े.तसेच पाणीपुरठ्याबाबत ज्या शहरातील इतर समस्या आहेत त्या त्वरित निकाली काढाव्या या आशयाचे निवेदन शेकडो शिवसैनिक युवासैनिक तसेच महिला आघाडीच्या सदस्यांनी पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केले.
व सविस्तर चर्चा केली त्यावर पाणीपुरवठा अधिकारी यांनी अकोट नगरपालिका यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करून सर्व मागण्यांचे निराकरण करू असे सांगितले.यावर मनिष कराळे यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन छेडु व वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शहर प्रमुख सुनील रंधे,माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे,युवासेना संघटक अकोट वहिद खान,पांडुरंग वालसिंघे,शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश चांडालिया,रणजित कहार,दीपक रेखाते,बबलू नांदूरकर,ता.अध्यक्ष महिला आघाडी उषाताई गिरनाळे,सुभाष सुरत्ने आदिवासी ता.प्रमुख,शहर अध्यक्ष नर्मदा कहार,संजय पालखेडे,अनंत बाहाकार,रामनाथ तळोकर,शहीद खान पठाण,बंटी राऊत युवासेना तेल्हारा ता.समन्वयक,रितेश उजिडे युवासेना उपतालुका प्रमुख,अंकुश कुलट,तेजस गाढे,सोपान बोन्द्रे,संतोष तायडे, बजरंग गोतमारे,गोपाल कावरे,पिंटू पालेकर,किरण शेंडे,संतोष मोहोकार,मनिष काका कराळे,शेखर बेडवाल, गणेश कुलट,अंकुश लोखंड,गणेश रेळे,शिवा रेळे,नारायण पोटे,पवन सावरकर, प्रमोद गोतमारे,पवन बागडे,रवी मंगवानी,जितू चंडालिया,सोपान साबळे,पंकज धांडे,निखिल कोल्हे,शुभम जवंजाळ,नवनीत राठी,स्वराज पागधुने,पवन सावरकर,महेश पाटील,अमर पाटील,सार्थक भेले,गोपाल ढेपे,गणेश बुरुंगे,गणी भाई,सादेका बी,सलमा बी,माँलन बी,जरीन बी,हसमुद बी,ताराबाई,रजिया बी,नर्गिस बी,न्यानेश्वर मुंडे,ओंकेश कांदे,नवनाथ आंधळे,न्यानेश्वर घोलोने,आदित्य गावंडे,चेतन भारसाकळे,लखन सुरत्ने,ऋषी आवारे,संजय कराळे,गौरव येडणे,मोंटू हिंगणकर, शुभम परियाल,देवा गिरे,नितीन पवार,कृष्णा पवार,ऋषी अग्रवाल,श्याम टिंगरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी व नागरीकांची होती.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले.