जिजामातामध्ये कल्पनाशक्तीला आले उधान ; छोट्या वैज्ञानिकांनी साकारली भन्नाट उपकरणे

0
1037
Google search engine
Google search engine

जिजामातामध्ये कल्पनाशक्तीला आले उधान ; छोट्या वैज्ञानिकांनी साकारली भन्नाट उपकरणे

सोलापूर प्रतिनिधी : रजनी साळवे

रस्तेच जर पाणी शोधुन घेणारे असतील तर पावसाचे पडलेले पाणी वाहून वाया जाणार नाही. घरांच्या भिंतीच जर उष्णता रोधक असतील तर कडक उन्हाळ्यातही उकडणार नाही आणि कारखान्यांतून सोडले जाणारे विषारी पाणी रिसायकलींग केले तर नदी, ओढ्यांतील जीवसृष्टीला घातक ठरणार नाही…अशा आणि अशाच अनेक संकल्पना घेऊन जिजामाता कन्या प्रशालेच्या विद्यार्थींनींनी तयार केलेली वैज्ञानीक उपकरणे पाहताना त्यांचे करावे तेवढे कौतूक थोडेच वाटते.

शिक्षण प्रसारक मडळ अकलूज संचलीत जिजामाता कन्या प्रशालेत आज विज्ञान, गणित व भूगोल विषयावरील

प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक भोसले यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी प्रा. रामभाऊ सावळसकर होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री जैन, पर्यवेक्षक शरद जगताप उपस्थित होते.

इ. ९ वी मधील सिध्दी शेटे या विद्यार्थीनेने तहाणलेला रस्ता हे उपकरण तयार केले आहे. छोट्या व मोठ्या खडीमध्येसिमेंट मिसळून वैशिष्ट्यपुर्ण पध्दतीने तयार केलेला हा रस्ते पावसाचे सांडलेले पाणी शोधुन घेऊन जमिनीकडे पाठवतो. सध्याच्या डांबरी रस्त्यावर पाणी साठले तर तेथे डांबर धुवून जावून लगेच खङा पडतो. तिने बनवलेला हा रस्ता अत्यंत उपयुक्त सिध्द होणारा आहेत्याच पध्दतीने इ. ५ वीच्या किर्ती कदमने सेन्सॉरयुक्त रस्ता तयार केला आहेरात्रीच्यावेळी आपोआप रस्त्यावर लाईट लागतील असे उपकरण तिने तयार केले आहे. कारखान्यांमधून निघणारे विषारी पाणी नदीमध्ये, ओव्यांमध्ये सोडले असता त्यातील जीवसृष्टीसाठी ते घातक असते. अशा पाण्यावर प्रक्रिया कशा पध्दतीने करता येईल असे उपकरण सना बागवानने तयार करून पाणी वाचवण्याची कल्पना मांडली आहे. याबरोबरच सिड प्लांटेशन, प्लास्टिक रिसायकलींग व इतर अनेक वैशिष्ट्यपुर्ण प्रयोग इ. ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थनींनी बनवले आहेत.

परिक्षणाचे काम श्रीकांत राजमाने, भारत बाबर, रामभाऊ सावळसकर यांनी केले. यावेळी विज्ञान शिक्षक सुनिल कांबळे, उदय उरणे, रमेश चौधरी, दिपाली राजमाने, सोनाली चौधरी, स्मिता दळवी, मुक्ता मिसाळ, सुत्रसंचलन विलास काटे, जयप्रकाश जगताप, बिभिषण जाधव उपस्थित होते.