उमरग्यात दोन गटात तुंबळ हाणामारी

0
1930
Google search engine
Google search engine

उमरगा : राष्ट्रीय महामार्गावर न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी ( ता. ०५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरूणांच्या दोन गटात तुंबळ हाणीमारीचा प्रकार झाला. या प्रकारामुळे महामार्गावरील वहातुक ठप्प झाली होती.तर ग्रामस्थ भयभीत झाले होते .
दरम्यान हाणीमारीच्या उद्देशाने तरूणांचा लोंढा जुने तहसीलच्या दिशेने जात असताना ड्यूटीवर असलेल्या न्यायालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी भांडण सोडवित मोठ्या धाडसाने कांही तरूणांना ताब्यात घेतले. ऐन महामार्गावर सुरू असलेला हाणामारीचा थरार पाहुन लोकांमध्ये कांही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबतची माहिती अशी की, मागे झालेल्या हाणामारीच्या प्रकरणानंतर दोन गटातील तरूणांचा घोळखा राष्ट्रीय महामार्गावरील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमला होता. कांही जणांनी समजूत काढून भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. पंरतू कांही क्षणातच पून्हा दोन्ही गटात फ्रिस्टाईल हाणामारी सुरू झाली. कांही जण टमटममध्ये ठेवलेल्या बियरच्या रिकाम्या बाटल्या डोक्यावर फोडण्याचा प्रकार सुरु केला. एकाने तर कत्ती, चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात हाणामारीसाठी पाठलाग सुरू झाला, जवळच जुने तहसील कार्यालय आणि न्यायालय आहे तेथे कार्यरत असलेले पोलिस नाईक राजीव माचेवाड, सहायक फौजदार श्री. गायकवाड यांनी या तरूणांचा पाठलाग करून मोठ्या धाडसाने ताब्यात घेतले. त्यामूळे कांही तरूण पळत सूटले. पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी घटनास्थळी पाठविलेला पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. या प्रकारानंतर पोलिस ठाण्यात तरुणांची गर्दी दिसून आली. जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसाकडून या घटनेशी संबंधी माहिती घेण्याचे काम सुरू होते. हा प्रकार cctv कॅमेरात कैद झाल्याने पोलीस काय कारवाई करतात हे महत्वाचे.