जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आगामी निवडणुकांसाठी आकोटात इच्छुकांची पोस्टरबाजी

0
998
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

कधी काळी काँग्रेसचा गड असणारा अकोट विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 15 वर्षापासून सत्ते बाहेर आहे. येत्या काळात लोकसभा विधानसभा तथा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष यात्रे निमित्य इच्छुकांची पोस्टरबाजी हे आकोटच्या जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे. इच्छुकांच्या पोस्टर बाजीला निमित्त होते काँग्रेसच्या जन संघर्ष यात्रेच्या स्वागताचे.

अकोट तालुक्यातील काँग्रेस ही कायम गटातटात विभागलेली दिसते या गटबाजीच्या घुसमटीला जनसंघर्ष यात्रे निमित्त आयोजित जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उघडपणे बोलुन दाखवले.आपसातील गटबाजीमुळेच काँग्रेस कायम विजयापासून दूर राहते तेव्हा कार्यकर्ता पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करत पक्षाला सोन्याचे दिवस आणण्याचा जाहीर सल्लाच खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्ता पदाधिकारींना दिला.त्यांनी समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करणार असल्याचे सांगितले समविचारी पक्ष असणाऱ्या सर्वांना महाआघाडीत सामावून घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पुराने खांब म्हणुन जुन्या नेत्यांचा गौरवही केला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी उत्साही कार्यकर्त्यांनी फोटो घेण्यापेक्षा पक्षाला विजयी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या सूतोवाचानुसार महाआघाडीत अकोट हे इतर पक्षांच्या वाट्यास गेल्यास इच्छुक पोस्टर बाजांचे काय होईल अशी खुमासदार चर्चाही सभास्थळी ऐकावयास मिळत होती. तर जन संघर्ष यात्रेच्या निमित्ताने का होईना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले एवढे मात्र खरं