परंड्यात बडे घोटाळे उघड होण्याची दाट शक्यता ; तेरी भी चूप अन् मेरी भी चूप

0
1880
Google search engine
Google search engine

परंड्यात बडे घोटाळे उघड होण्याची दाट शक्यता ; तेरी भी चूप अन् मेरी भी चूप

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मोठे घोटाळे उघड होणार आसल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. परंडा नगर परिषदेचे नगर अध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत मनसेच्या पदाधिकार्यांनी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अन्यथा नगर परिषदेला खळखट्याक स्टाईलने टाळे ठोकणार आसल्याचा ईशारा दिला आहे.दरम्यान मनसेच्या पदाधीकार्यांना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी दहा दिवसाचा अलटिमेट (कालावधी) दिला आहे . झोन दाखला खोटा कि खरा हा दहा दिवसानेच कळेल परंतू या मनसेला दिलेल्या अलटिमेट ची परांडा शहरातील नागरीकांना मोठी क्रिकेटच्या सामन्यासारखी उत्सूकता लागली आसून काऊनडाऊन सुरु आहे. सध्या परंडा येथे चर्चेला मोठे उधाण आले तर आहेच पण परंडा येथील बड्या नेत्यांचे भलतेच मोठे घोटाळे आसल्याची चर्चा सुरू आहे. नेतेमंडळींनी केलेल्या कामांची पारदर्शकता पडताळली तर एकमेंकांना बोटे कधीच दाखवणार नाहीत कारण तेरी भी चूप अन् मेरी भी चूप अशी परस्थीती परंडा येथील बड्या नेत्यांची झाली आहे . हे नेते कधीच कधीच एकमेकांवर आरोप करत नाहीत याचा अर्थ मिल बाटके खाऐंगे तुम भी आधा हम भी आधा या म्हणी चर्चील्या जात आहेत . एका पक्षाचा पदाधिकार्यांच्या हाती हे सबळ पुरावे हाती लागले आहेत त्यामुळे आता आणखीन परंड्याच्या बड्या नेत्यांनी केलेले घोटाळे उघड होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या सामन्यात आणखीन कोणत्या नेत्यांची विकेट पडणार याकडे परंडाकरांचे डोळे लागले आहेत.