पत्रकारावरील आक्रमणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी ! अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

0
804

सोलापूर- कसायांचा उद्दामपणा आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या आक्रमणातील संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून अवैध पशूवधगृहे आणि मांस विक्रीची दुकाने यांच्या मालकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात देण्यात आले. पोलीस उपायुक्त श्री. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे श्री. अंबादास गोरंटला, अखिल भारतीय हिंदू महासभेचे श्री. सुधीर बहिरवाडे, श्री. विजय यादव, भाजप युवा मोर्चाचे श्री. संदीप जाधव, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. रवि गोणे, गोरक्षक श्री. विजय कुलथे, सर्वश्री विवेक इंगळे, विनायक पाटील, उदय वैद्य, अविनाश हजारे, अमित परदेशी, किरण पंगुडवाले यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. मागील काही मासांपासून सोलापूर शहरात अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

२. गोवंशहत्याबंदी होऊनही सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात गोवंशांची हत्या होते. याविषयी हिंदु महासभेच्या वतीने अनेक वेळा पोलिसांकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.