कवी पांडुरंग माळी(गुरूजी)यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाहीर शामराव खडके यांना काव्य रत्नपुरस्कार जाहीर.

0
1066
Google search engine
Google search engine

सांगली न्युज: सांगली जिल्ह्यातील तडसर (ता कडेगांव) येथील कवी पांडुरंग माळी (गुरुजी) यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा काव्य रत्न पुरस्कार कवी, शाहीर शामराव खडके यांना जाहीर झाला आहे ,अशी माहिती मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा विश्वनाथ गायकवाड व संयोजक सदानंद माळी यांनी दिली. पांडुरंग माळी हे कलाकार , नाटककार ,शाहीर , कवी , लेखक या साहित्य क्षेत्रात कार्यरत होते . त्याच्या नांवाने काव्यक्षेत्रात उल्लेखनीय काव्य लेखन करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो . दोन हजार रूपये रोख , सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी गझलकार सुनंदा शेळके , शाहीर कुंतीनाथ करके , शाहीर बजरंग आंबी यांना या पुरस्काराने गौरविले आहे. हा पुरस्कार माळी कुटुंबीय व कडेगाव – खानापूर मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणार आहे. शाहीर शामराव खडके यांनी शाहीर गीतकार कवी या साहित्य प्रकारात लेखन करून वेगळा ठसा उमटवला आहे. प्राथमिक शिक्षक ते केंद्र प्रमुख म्हणून काम करताना आपली शाहीरी परंपरा जोपासत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छता ,आरोग्य , साक्षरता , व्यसनमुक्ती आदी विषय घेऊन शाहिरीतून सामाजिक प्रबोधन व समाज जागृती करीत आहेत. गेली ३० वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शाहीरी कार्यक्रमाचे सादरीकरण ते करीत आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ , गीतकार जगदिश खेबुडकर पुरस्कार मिळाले आहेत.
हा पुरस्कार सोहळा तडसर (ता कडेगाव)येथे शनिवार दि १५ डिंसेबर रोजी कडेगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी व चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एस. वाघमोडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अध्यक्षस्थानी सरपंच हणमंतराव पवार भूषविणार आहेत . हा सोहळा प्रशांत नाट्य मंदीर तडसरला सांयकाळी ७ वाजता होणार आहे .
या पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा विश्वनाथ गायकवाड , दिपक पवार , दत्तात्रय सपकाळ , रघुराज मेटकरी याचा समावेश आहे . तरी साहित्यिक , ग्रामस्थ व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजक सदानंद माळी यांनी केले आहे.विषेश म्हणजे या सोहळ्यात बाल शाहीर अमोघराज आंबी वय वर्षे ४ याचा पोवाड्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.