महाराष्ट्रात महिलांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक : गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
894
Google search engine
Google search engine

सांगली न्युज : महिलांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन दि. 13/12/2018 रोजी प्रांत अधिकारी कडेगाव तसेच पोलिस निरीक्षक कडेगाव पोलिस स्टेशन व तहसीलदार कडेगाव यांना अँड. प्रमोद पाटील, श्री. सुनील मोहिते, सौ. नेहा सुतार, मुमताज तांबोळी, सुनीता मोहिते, गौतमी दोडके व इतर महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणाहून आलेल्या महिला यांनी दिले.आज कडेगाव येथे लोणावळा, सातारा, चिपळूण, पलूस, सांगली, तासगाव, पाटण, कडेगाव तालुका, विटा, उंब्रज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात महिला जमलेल्या होत्या.महिलांना कापड पिशव्या, मेणबत्ती, अगरबत्ती अश्या स्वरूपाचे घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी लोणावळा येथील कंपनी चा मुख्य सूत्रधार याने प्रत्येकी 651 रुपये डिपॉझिट घेतलेले आहे. तसेच गेले तीन महिन्यापासून महिलांना काहीही काम दिलेले नाही. महाराष्ट्रातील हजारो महिलानी या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.*वर्ल्ड ट्रस्ट द मनी कंपनीचा मालक मनीष लोकरण व सुनीता दास कडेगाव* तालुक्यात येणार असलेची बातमी लागलेमुळे या महिला कडेगाव मध्ये जमा झाल्या होत्या. या महिलांनी त्याला पकडून कडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जमा झालेल्या सर्व महिला या आपआपल्या हद्दीतील पोलिस स्टेशन ला त्याचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत..कंपनी मालक यास मदत करण्यास कडेगाव तालुक्यातील काही एजंट सामील असल्याची माहिती समोर येत आहे.. यावेळी महिला मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय आवार व पोलिस स्टेशन कडेगाव येथे जमल्या होत्या व त्यांनी दोषीवर गुन्हा दाखल करावा अश्या मागणी साठी ठाण मांडून बसलेल्या होत्या.*यावेळी अँड. प्रमोद पाटील म्हणाले की :*मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाली आहे. सर्व महिला या गरीब कुटुंबातील असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. छोटे छोटे व्यवसाय करून महिला स्वताचे पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या कंपनी मुळे हजारो महिला गट स्थापन करून महिलांचे अडाणी पनाचा फायदा असले लोक घेत आहेत. अजून मोठ्या प्रमाणात हा घोटाळा उघडकीस येणार आहे. दोषी असेल त्याचेवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अँड. प्रमोद पाटील यांनी केली.