अखेर घुईखेड स्टेट बँकेतुन कॅशीयर मिरगेंची हकालपट्टी – तीन दिवसात मिळणार नवीन कॅशीयर

0
740
Google search engine
Google search engine

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली घुईखेड बँकेला भेट

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 


     चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड स्टेट बँकेला तीन दिवसांत नवीन कॅशीयर मिळणार आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी घुईखेड शाखेला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. अशातच एका वृध्द महिलेचे बँकेचे पासबुक फाडून अंगावर फेकणाऱ्या हिटलर कॅशीअर जितेंद्र मिरगे यांना वरिष्ठ कार्यालयाने रजेवर पाठविल्यानंतर त्यांची घुईखेड शाखेतुन हकालपट्टी केल्याची माहिती मिळाली. 


      घुईखेड येथील रहिवासी असलेल्या रमाबाई वरघट ह्यांनी खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे आले की नाही याची माहिती घेण्याकरीता सोमवारी घुईखेड स्टेट बँकेत गेल्या असता कॅशीयर जितेंद्र मिरगे यांनी पासबुक प्रिंट न करून देता थेट त्यांच्या अंगावर फाडून फेकून अपमानजनक वागणुक दिली. यानंतर सदर महिलेने  बँक व्यवस्थापकांकडे तक्रार सुध्दा केली होती. गावकऱ्यांनी ताला ठोको आंदोलनाचा इशारा दिल्याने वरिष्ठांनी चौकशीला प्रारंभ केला होता. यामध्ये त्यांनी कॅशीयर मिरगे यांना कार्यालयातर्फे सक्तीवर पाठविल्या नंतर त्यांची घुईखेड शाखेतुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची बदली धारणीवरून २६ किलोमीटर वरील सादरावाडी या गावातील शाखेत करण्यात आली. तर त्यांच्या जागी घुईखेड शाखेत प्रभारी कॅशीयर म्हणुन अमरावती येथील स्टेट बँक कॅम्प शाखेचे ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. गुरूवारी कॅम्प शाखेचे व्यवस्थापक महेंद्र कुंभारे, प्रादेशिक व्यवस्थापक ओम शिवप्रीया, क्षेत्रिय कार्यालय व्यवस्थापक महेश पिल्ले यांनी घुईखेड शाखेत भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करून स्थिती जाणुन घेतली. यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक ओम शिवप्रीया यांनी तीन दिवसांत नियमीत कॅशीयर नेमणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच आठ दिवसानंतर घुईखेड येथे पुन्हा भेट देणार असल्याचे सांगितले. कॅशीयरची बदली झाल्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले असुन आता बँकेची स्थिती सुधरेल असे मत काहींनी व्यक्त केले.