बाळापुर शहरातील वाहतूक सुरळीत करण्या साठी नागरिकांनी सहकार्य करावे – ठाणेदार गजानन शेळके

0
797
Google search engine
Google search engine

अकोला/प्रतिनीधी

बाळापूर शहरातील अस्तव्यस्त वाहतूक हा अतिशय जुना परंतु सामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कित्येक वर्षा पासून ह्या समस्येचा सामना बाळापूर शहरातील सामान्य नागरिक करीत आहेत, मुख्य रस्त्या वरील अतिक्रमण व शहराची भौगोलिक परिस्थिती मुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होतांना दिसत आहे, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता व नागरिकां मध्ये असलेला स्वयंम शिस्तीचा अभाव ह्या मध्ये बदल होतांना दिसत नाही, नव्यानेच पोलिस स्टेशन बाळापूर येथे आलेले ठाणेदार गजानन शेळके ह्यांनी ही गंभीर समस्या सोडविण्या साठी प्रयत्न सुरू केले असून दिनांक 13।12।18 रोजी बाळापूर येथून बाहेरगावी जाणाऱ्या काळी पिवळी व आटो चालकांची पोलिस ठाण्यात मीटिंग घेऊन वाहतूक वयवस्था सुरळीत करण्या साठी सहकार्य करण्याचे आवाहन केले,

सहकार्य न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला होता, आज ठाणेदार शेळके स्वतः कर्मचाऱ्यासह वाहतुकीची जास्त वर्दळ असणाऱ्या जयस्तंभ चौक, बसस्थानक परिसर, बडीशाह मस्जिद ह्या भागात पायी फिरले व त्यांनी काही भागातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले व रस्त्यावर लावण्यात येणारी वाहने काढून काही वाहनावर दंडात्मक कार्यवाही सुद्धा केली,

सर्व बाजुंनी वळणावर पांढऱ्या चुन्याच्या रेषा मारून वाहने त्याचे पलीकडे पार्क करण्याच्या सूचना केल्या, दुकाना समोरील तयार करण्यात आलेले अतिक्रमण काढून घेतले, नागरिक व व्यापाऱ्यांनी वाहतूक वयवस्था सुरळीत करण्या साठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार गजानन शेळके ह्यांनी केले आहे.