अकोट येथिल वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा रविवारी उद्घाटन समारंभ

0
1003
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासुन सातत्याने मागणी होत असणाऱ्या अकोट येथील नवीन दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालयाचे आकोटवासियांचे स्वप्न येत्या रवीवारी पुर्णत्वास जाते आहे.अकोटातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवार दिनांक 16 डीसे. 2018 ला सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ दिवाणी व फौजदारी न्यायालय अकोट येथे आयोजित करण्यात आला असुन या समारंभास उद्घाटक म्हणून उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर चे मा. न्यायमूर्ती श्री रवी कृ.देशपांडे हे लाभणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणुन उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री विनय म.देशपांडे लाभणार आहेत.तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. रणजीत पाटील असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री यनशिवराज खोब्रागडे हे राहणार आहेत.

अकोटला मंजुर झालेल्या या वरिष्ठ स्तर न्यायालय उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन वकील संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.अकोटच्या न्यायालयीन वर्तुळात या उपलब्धीने समाधान व्यक्त होत असुन सर्वाच्या सामुहीक प्रयत्नातुन हे स्वप्न पुर्ण होत असल्याच्या भावना यावेळी न्यायालय परीसरात व्यक्त होत आहेत.