पारस फाट्या जवळील ट्रक ड्राइवर खून प्रकरणातील आरोपीं कडून गुन्ह्यातील मुद्देमाल व शस्र जप्त

0
996
Google search engine
Google search engine

आणखी एक गुन्हा उघड

अकोला/प्रतिनीधी

पारस फाट्या जवळील ट्रक ड्राइवर खून प्रकरणातील आरोपीं कडून गुन्ह्यातील मुद्देमाल व शस्र जप्त करण्यात बाळापुर पोलीसांना यश आले आहे.तसेच तपासात आरोपीं जवळुन आणखी एक गुन्हा उघड झाला असल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे.

पोलीस सुत्रांनुसार दिनांक 5।12।18 चे रात्री दरम्यान पारस फाट्या जवळील जम्मू च्या धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक ड्राइवर ला चोरीच्या उद्देशाने आलेल्या लुटारूनी चाकूने केलेल्या मारहाणीत ट्रक ड्राइवर विजयसिंग रॉय जगदीप रॉय हा मरण पावला होता. ह्या मध्ये 6 ते 7 आरोपी सहभागी होते, त्या पैकी 2 आरोपी १) संतोष बागी भोसले 2) नागार्जुन अरविंद भोसले रा अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती ह्यांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले होते, दोन्ही आरोपींना तपास अधिकारी बाळापूरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी न्यायालयात हजर करून 15।12।18 पर्यंत पोलिस कोठडी घेऊन विचारपूस केली .तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, बाळापूर पोलिसांनी आणखी तपास केला असता, 10।5।18 रोजी शेगाव टी पॉईंट जवळील पठाण पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मध्ये असलेल्या ट्रक ड्राइवर व क्लिनर ह्यांना ही चाकूने मारहाण करून 10,000 रुपये व 2 मोबाइल घेऊन पळून गेल्याची सुद्धा कबुली सदर चोरट्याने दिली ह्या वरून बाळापूर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ,पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोशी, पोलिस हवालदार शुद्धोधन इंगळे, हर्षल श्रीवास ह्यांचे पथकाने अंजनगाव सुर्जी येथे जाऊन आरोपी कडून 2 सुरे, व 2 मोबाइल जप्त केले, नमूद आरोपी हे आणखी काही गुन्ह्यात सामील आहेत का ह्या बाबत बाळापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत, पुढील तपास पोलिस अधीक्षक राकेश कला सागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहल शेख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी आणि पथक करीत आहे.