पुणे येथील ‘अक्षरनामा’ संकेतस्थळाचे संपादक आणि तिचे मालक यांच्यासह लेखक निखील वागळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

0
712
Google search engine
Google search engine

‘अक्षरनामा’ संकेतस्थळावरून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारा लेख प्रसारित केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – ‘अक्षरनामा’ या संकेतस्थळावर १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘सनातनच्या मुसक्या कोण बांधणार? ’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातनची अपकीर्ती करण्यात आली होती. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाल्याने संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी या संकेतस्थळाचे मालक असलेले पुणे येथील मे. डायमंड पब्लिकेशन, संपादक राम जगताप आणि या लेखाचे लेखक निखील वागळे यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाईच्या मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्याकडून मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी केली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी-ताकभाते, कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.