जिल्हा परिषद टोंगलाबाद शाळेला शेळके परिवार तर्फे वाटर कुलर भेट प्रेरणादायी कार्य : स्वातंत्र्य सैनिक वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलांकडून अनोखी भेट

0
831
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे  – (शहेजाद खान ) 
लहानपणी शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडं पालटलेले पाहून आपण ही या समाजाचे देणं लागतो. आपल्या वडिलांनी या देशासाठी व गावासाठी भरीव योगदान दिले. त्यांचेच पावलावर पाय ठेवत शेळके कुटुंबातील मुलांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. एकनाथजी शेळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला वाटर कुलर भेट देवून जिल्हा परिषद टोंगलाबाद शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीची अनोखी भेट  दिली.


    लतालुक्यातील राजुरा व कवठा कडू केंद्रांतर्गत दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद शाळा टोंगलाबाद  येथे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान याच गावातील रहिवासी असलेल्या केंद्रप्रमुख वंदना शेळके यांना बालपणीच्या एका खोलीच्या शाळेचे आज मोठे वटवृक्षात रुपांतर झालेले दिसून आले. या दरम्यान सीमेवर कार्यरत असणाऱ्या प्रफुल रामेश्वर तलवारे या युवकाने येथील विद्यार्थ्याची पाण्याची तहान भागावी म्हणून भेट दिलेली पाण्याची टाकी दृष्टीत पडली. शाळेचे पालटलेले रुपडं पाहून तेंव्हाच त्यानी या शाळेला दिवाळीत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाटर कुलर देण्याची घोषणा केली. आपण दिलेल्या वचनाची प्रतिपूर्ती करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत सर्व बहिण-भाऊ एकत्र येवून दिनांक १० डिसेंबर रोजी वाटर कुलर शाळार्पण सोहळा आयोजित केला. स्व.एकनाथजी शेळके यांच्या पत्नी विमलाताई शेळके यांचे हस्ते या वाटर कुलर चे शाळार्पण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मणराव सातपैसे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे,लविस्तार अधिकारी सदाशिव दाभाडे, छबुताई सोळंके, केंद्रप्रमुख सुभाष भगवे, माजी सरपंच संगीतराव हजारे, विषयतज्ज्ञ श्रीनाथ वानखडे, उमाकांत जिरापुरे आदींची तसेच शेळके कुटुंबातील सुधीर शेळके, माजी जि. प. सदस्या डॉ. अल्का काळे, उज्वला ठाकरे, वंदना शेळके(ठाकरे), सुनील शेळके, सुनील शेळके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.याच कार्यक्रमात जिल्हा परिषद चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कुशल व्यास यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद टोंगलाबाद शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर मधुकर काजे, मिलिंद रघुवंशी, राजेंद्र पाटील, मनोहर रोहणे आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.