मनसेच्या आंदोलनांचा मुख्याधिकार्यांना धसका ; लेखी पत्र देऊन अंग झटकण्याचा प्रयत्न

0
942
Google search engine
Google search engine

मनसेच्या आंदोलनांचा मुख्याधिकार्यांना धसका ; लेखी पत्र देऊन अंग झटकण्याचा

प्रयत्न

मुख्याधिकार्यांनी कार्यवाही न केल्याने नगराध्यक्ष पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे दाद मागणार – सौ वैशाली गायकवाड

उस्मानाबाद – जिल्ह्यातील परंडा नगर परिषदेत नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून यलो झोन मधील जागा स्वताच्या मुलाच्या नावे केल्याप्रकणी कार्यवाही करा अन्यथा खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्ष सौ वैशाली गायकवाड यांनी मुख्याधिकार्यांना दिला होता .तेंव्हा मुख्याधिकारी यांनी दहा दिवसाची दिलेली मुदत संपल्याने आज मनसे कोणत्या पद्धतीचे आंदोलन करणार या विषयी मुख्याधिकार्यांनी धसका घेतल्याचे जाणावले तर लेखी पत्र देऊन कनीष्ठ कर्मचार्यावर हा प्रकार ढकलून अंग झटकण्याचा प्रयत्न केला असून या बाबत जिल्हाधिकार्यांकडे नगर आध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच संबंधीत कर्मचार्यावर कायदेशीर कार्यवाही करून झालेले खरेदीखत रद्द करण्याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती मनसे महिला जिल्हाअध्यक्ष वैशाली गायकवाड यांनी दिली.
परांडा नगर परिषदेतील नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून मुलाच्या नावे केलेली जागा खरेदिखत रद्द करावे व दोषींवर कार्यवाही करावी या विषयी मनसेने दहा दिवसापूर्वी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले होते . आज मुख्याधिकारी यांनी दिलेली मुदत संपल्यामुळे मनसे कोणत्या प्रकारचे आंदोलन करणार या विषयी मुख्याधिकार्यांना धासती तर नागरीकांना उत्सुकता होती .
मुदतीत लेखी कार्यवाही केल्याचे पत्र न मिळाल्यामुळे मनसेच्या वतीने चोळी बांगडी देऊन आंदोलन करण्यात येणार होते . कार्यवाही बाबत जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकारी वैशाली गायकवाड यांच्या नेत्रत्वाखाली नगर परिषदेत गेले आसता मुख्याधिकार्यांनी लेखी पत्र देऊन झोन दाखल्यावर संबंधीत विभाचे लिपीक महेश कसबे यांनी करिता म्हणुन अनाधीक्रत रित्या व जावक क्रमांक न टाकता दिल्याचे लेखी कळवले आहे . संबधीत कर्मचार्यावर का कार्यवाही केली नाही आसे विचारत मनसे कार्यकरत्यांनी चोळी बांगडिचा आहेर देत आसताना उपस्थीत पोलिस कर्मचार्यांनी ताब्यात घेतले . लेखी पत्रा नंतर हा प्रकार म्हणजे जबाबदार अधीकार्यांनी कनिष्ठ अधिकार्यावर टोलवाटोलवी करत राजकिय दबावाला बळी पडल्याचा असून या प्रकरणी नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी व संबंधीत कर्मचार्यावर कायदेशीर कार्यवाही करून पदाचा गैरवापर करून मुलाच्या नावे केलेले यलो झोन जागेचे खरेदिखत रद्द करावे व नगराध्यक्ष पद रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहिती मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी दिली .यावेळी शाबीर शेख ,दत्ता बोंदर ,सुधाताई झेंडे ,सुरेश पाटिल , पांडूरंग सुतार ,किशोर गायकवाड ,बिभीषण शिंदे ,वसंत बारकुल ,मुर्तुज सय्यद , समाधान बोंदर ,आकाश बोंदर ,आनिल गायकवाड ,आकरूळ जगताप , सुनील शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .