जवळा येथील जि.प. शाळेचा परिसर तंबाखूमुक्त

0
672
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा येथील व राजुरा केंद्रअंतर्गत येणारी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथील शाळा परिसर नुकताच तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रबोधन करून शाळा परिसर कसा तंबाखू मुक्त होईल याबाबत विविध उपक्रम राबविले. यामध्ये प्रभात फेरी, शपथविधी, शाळेच्या भिंतीवर तंबाखू मुक्तीबाबत  जनजागृतीचे घोषवाक्य चिटकवून प्रचार व प्रसार केला.
     याकरिता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुवर्णा खाटे, उपाध्यक्ष उज्वला गोंडाणे, सरपंच साधना जगताप, नारायण मोडक, पोलीस पाटील पंकज जगताप आदींचे सहकार्य लाभले. शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याकरिता मुख्याध्यापक राजेंद्र वाघ, मंगला जाचक, संध्या तायडे व शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.