जंगली शावली बाबांच्या जावरा दरगाह वर संदल उर्स उत्साहात साजरा – घोड्यांनी नृत्याद्वारे दोन पायावर उभे राहून दिली सलामी

0
796
(फोटो – शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे – 

 सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील जावरा येथील जंगली शावली बाबा यांच्या दर्गाचा संदल-उर्स मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात सोमवारी साजरा करण्यात आला. संदल उर्स निमित्त घुईखेड गावातुन दर्गापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील जावरा येथील जंगली शावली बाबा दर्गाच्या संदल उर्स निमित्त घुईखेड गावातुन गुरूवारी निघालेल्या मिरवणुकीत चादर ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टरला फुलांनी सजवण्यात आले होते. कव्वाली बँजोच्या तालावर नृत्य करणारे घोडे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. या संदल मिरवणुकीत ५ घोडे, ऊंटाचा रथ, कव्वाली चमु चा समावेश होता. मिरवणुकीत घोड्यांनी नृत्याद्वारे दोन पायावर उभे राहून दिलेल्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कामठी येथील नौशाही पप्पुभाई मटका पार्टीने मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी युवकांमध्ये उत्साह संचारला होता. संपुर्ण घुईखेड गावातुन मिरवणुकीव्दारे संदल मार्गक्रमण करत जावरा गावी पोहचले. जावरा गावातुन सुध्दा भ्रमण करीत जंगली शावली बाबा दरगाह वर दुपारी ३.३० वाजता पोहचले. दरगाहच्या मजारवर संदल लावून उपस्थित भाविकांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली. संदलनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुईखेड, जावरा, चांदूर रेल्वे तथा परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शेख रफीक, अफसर खान, शेख सोनु, नासीर खान, शकील खान, शेख इसराईल, शेख मुजम्मील, शेख अनिस, शेख इर्शाद, शेख शकील, अकिल खान, शेख समीर, शेख आसीफ, अर्शद खान, शेख चिंटु, शेख शहिद, शेख मोनु, वकिल खान, शेख समीर, हाफिज खान, असलम शेख, साजीद खान, शेख सलीम, शेख साजीद, शेख हाफीज, अब्दुल रफिक, शहेजाद खान, शेख पप्पु, नरूल्ला शाह आदींनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट सायंकाळी झाला.