परमहंस यात्रा कंपनीच्या वतीने सामान्य जनांना वैष्णोदेवी पशुपतीनाथ नेपाळ यात्रा ,रामेश्वरम धाम यात्रा पर्वणी…!

0
2756

अकोट/संतोष विणके

तालुक्यातील श्रींच्या भक्ती आराधनेने प्रसिद्धी पावलेल्या श्री योग योगेश्वर संस्थांनच्या वतीने सामान्य जनांच्या सोयीकरता अत्यल्प दरात विविध तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी परमहंस यात्रा कंपनी द्वारा विदर्भातील सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गासाठी व सर्व भाविक भक्तांसाठी वैष्णोदेवी यात्रा पशुपतिनाथ नेपाळ विदेश यात्रा रामेश्वरम धाम तीर्थयात्रेचे अत्यल्प दरात आयोजन केले जात असते. या वर्षीदेखील भाविकांना ही संधी आयोजकांच्या वतीने उपलब्ध असणार असून फक्त ७००० रुपयांमध्ये वैष्णोदेवी यात्रा तर रामेश्वरम धाम यात्रा ७५०० हजार रुपये मध्ये पशुपतिनाथ तीर्थयात्रा १००००(रेल्वेने)तर १६०००( रेल्वेने जाताना व येताना विमान प्रवास) रुपयात उपलब्ध असणार आहे. वैष्णोदेवी यात्रा दिनांक 10 मार्च ते 19 मार्च 2019 10 दिवस या दरम्यान असणार असून यामध्ये विविध प्रेक्षणीय स्थळे व राहण्याची जाण्या येण्याची VIP व्यवस्था असणार आहे.

यामध्ये माँ वैष्णो देवी दर्शन, कालभैरव दर्शन ,घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिर, या दर्शनी स्थळांचा समावेश राहील तसेच कुरुक्षेत्र मध्ये भगवान श्रीकृष्ण गीता स्थान, चंदीगडमधील रॉक गार्डन, अमृतसर मधील सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर दुधियाना मंदिर, आदींचा समावेश असणार आहे. वैष्णोदेवी यात्रेदरम्यान भाविकांना या विविध स्थळांची सफर घडवण्यात येणार आहे. तर पशुपतीनाथ नेपाळ यात्रा दिनांक 21 एप्रिल 29 एप्रिल 2019 अशी 9 दिवस असणार असून यामध्ये विविध प्रेक्षणीय स्थळे भाविकांना बघता येणार आहेत

यामध्ये गोरखनाथ मंदिर, पशुपतिनाथ जोतीर्लीग मंदीर , भक्तपुर मंदिर ,मनोकामना देवी मंदिर ,निळकंठ मंदिर जनकपुर सीता मंदिर.आदी स्थळ असणार आहेत.तर चार धामापैकी एक असणारे श्री रामेश्वर धाम येथील श्री राम कथा यात्रेचे आयोजन दिनांक 25 मे ते 4 जून 2019 या 11 दिवसाची यात्रा फक्त ७५०० हजार रुपये खर्च असणार आहे यातील अनेक प्रेक्षणीय स्थळे भाविकांना बघता येणार आहे. यामध्ये दर्शनिय स्थळः मध्ये 22 एकरावरील भव्यदिव्य रामेश्वर मंदिर, लक्ष्मण तीर्थ ,सीताकुंड, 22 कुंडाचे स्नान , सूर्यदर्शन समुद्रस्नान ,दर्शनीय 22 फूट उंच नंदी ,धनुष्यकोडी रामसेतू ,समुद्रातील इंदिरा गांधी ब्रिज ,बिबीशन मंदिर, कन्याकुमारी दर्शन स्वामी, विवेकानंद स्मारक ,मीनाक्षी देवी मंदिर ,दर्शन पद्मनाभ, मंदिर ,सुवर्णमूर्ती दर्शन, तिरुअनंतपुरम ,पद्मनाभ सुवर्णमंदिर ,दर्शनीय स्थळांची यात्रा होणार आहे. नाव नोंदणीसाठी व इतर माहितीसाठी परमहंस यात्रा कंपनी व योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष ह .भ.प.गणेश महाराज शेटे (मो.9767112112)यांच्याशी संपर्क करावा असे आयोजकांनी कळविले