एक विवाह ऐसा भी…लग्न समारंभात शेगोकार परिवाराने दिला रस्ता सुरक्षा संदेश…नवरदेव नवरीला आंदण हेल्मेटची भेट…

0
3973
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

स्थानिक बिलबिले मंगल कार्यालय येथे दि.१७ डीसे.ला आयोजीत शेगोकार कुटीबियांच्या लग्न समारंभात एक आगळा वेगळा विवाह पार पडला.लग्न समारंभात शेगोकार परिवाराने रस्ता सुरक्षा संदेश देत अनोखा सामाजिक संदेश दिला.तर जेसिआयच्या सदस्यांनी नवरदेव नवरीला हेल्मेटची भेट देत अनोखे आंदण दिले.हे लग्न होते पुजा संजयराव शेगोकार, यशोदा नगर, अकोट व मयुर रामराव निवल,गोपाल नगर, अमरावती यांचे. मोठया थाटामाटात पेशवाई पदधतीने हा विवाह संपन्न् झाला .

या विवाह अनुशंगाने जेसीआय अकोट च्या महीला समुहाने शेगोकार परिवाराच्या लग्नमंडपात रस्ता सुरक्षतेचे पत्रके वाटुन रस्ता सुरक्षे बददल सर्व व-हाडी पाहुण्यांना संदेश देऊन एक आगळीवेगळी जनजागृती केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवदाम्पत्यास स्टीलबर्ड हेल्मेट भेट देऊन नविन वैवाहीक जीवनाच्या शुभेच्छाही दिल्या .विशेष म्हणजे दोघेही नव वरवधु उच्चशिक्षीत अभियंता असुन पुणे येथे कार्यरत आहेत.

जेसीआय समुहाने घेतलेल्या हया अनोख्या प्रकल्पाचे लग्न व-हाडातील मंडळीनी उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी अनेक गणमान्य उपस्थीत होते त्यामध्ये प्रामुख्याने सामाजीक संदेश देणारे सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी या पुढाकाराचे कौतुक करुन हया धकाधकीच्या युगात प्रत्येक लग्न घरी परिवाराने जीवनावश्यक वस्तु (आंधण) मध्ये दोन हेल्मेटचा पण समावेश करावा असा सामाजिक संदेश दिला व नवदाम्पत्यास आर्शीवाद दिले. हया प्रकल्पा करीता जेसीरेट विंगच्या प्रकल्प प्रमुख म्हणुन जेसीरेट सौ. वैशाली दिपक हाडोळे व चेअरपर्सन सौ. दिपाली विनोद कडु, मायाताई इंगळे, ममताताई हाडोळे, मिनाताई शेगोकार, अरुणाताई शेगोकार,शारदाताई लहाने, शितलताई लहाने, सुषमाताई झाडे, रजनीताई पवार, राजश्रीताई बाळे , यांनी परिश्रम घेतले.

यावेळी जेसीआयचे अध्यक्ष निलेश हाडोळे उपाध्यक्ष किशोर लहाने , विनोद कडु,संजय शेळके, अनेक सामाजीक संस्थेचे व रोटरी क्लबचे सदस्य , जेसीआय चे माजी अध्यक्ष व गणमान्य सदस्य उपस्थीत होते.
विशेष म्हणजे जेसीआयचे माजी अध्यक्ष तथा हीरो शेतकरी मोटर्स चे संचालक नंदकिशोर शेगोकार हे गेल्या 6 वर्षा पासुन पोलीस स्टेशन, अकोट च्या संयुक्त् विदयमाने रस्ता सुरक्षतते बद्दल सतत जनजागृती करीत असतात. त्यांच्यांच कल्पनेतुन हा प्रकल्प् साकारुन यशस्वी करण्यात आला.