आज अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरिय सभा – केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख मार्गदर्शन करणार

0
516
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघांची अमरावती जिल्हास्तरिय सभेचे आयोजन आज २२ डिसेंबर, शनिवारी दूपारी ३ वाजता शासकिय विश्राम गृह, जुना बायपास रोड, बियाणी चौक, अमरावती येथे केले आहे.
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सभा होणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहे. यावेळी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील पत्रकारांच्या
विविध समस्यां बाबत चर्चा करण्यात येणार आहे. या सभेला अमरावती जिल्ह्यातील प्रिट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे शहरी व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारबंधू तसेच अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व सचिव यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले आहे..