विहीरीत पडलेल्या श्वानासाठी फायर ब्रिगेडसह धावून आले सामान्य अमरावतीकर

0
824
Google search engine
Google search engine

अमरावती/ संतोष विणके

स्थानिक अर्जून नगर परीसरात एका कॉलनीत दि.१५ डीसे.ला रात्री११.३० दरम्यान मांजरीच्या पिलांचा पाठलाग करताना एक कुत्रा विहिरीत पडला. त्याच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक गोळा झाले.नागरिकांनी निर्णय घेतला की त्याला वाचवायचे. प्रयत्न करून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नसल्याने शेवटचा उपाय म्हणून यातील एकाने फायर ब्रिगेडच्या 101 क्रमांकावर फोन लावला विशेष बाब म्हणजे अवघ्या दहा मिनिटात फायर ब्रिगेड ची गाडी अर्जुन नगरात दाखल झाली. सामान्य नागरीकांना ही बाब आश्चर्यकारक तर होतीच याशिवाय कर्मचाऱ्यांनी त्यांचे वरिष्ठांचे मार्गदर्शनात तातडीने कारवाई सुरू केली नंतर खालून पाण्यात पिंजरा टाकून त्याला वर उचलण्यात आले त्याला पाण्याचे वर थोडा वेळ विश्रांती घेऊ देण्यात आली आणि वर आलेला कुत्रा पाण्यात उडी मारणार नाही याची खात्री कर्मचारी व अंबाडकर साहेब यांनी दिल्यानंतर अस्वस्थ झालेले नागरिक शांत झाले नंतर त्याला बाहेर काढण्यात आले अन त्या श्वानाने सुरक्षित बाहेर निघाल्यानंतर धूम ठोकली परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. यांच्यादरम्यान वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे दहा मिनिटात फायर ब्रिगेडने तातडीने कारवाई करून त्याला इजा होऊ न देता बाहेर काढले त्यामुळे या रेस्कु अॉपरेशनमुळे नागरिकांची मने जिंकता आली असून अधिकारी व कर्मचारी प्रशंसेस पात्र आहेत असे नागरीकांनी कौतुकाने सांगीतले. या संपूर्ण कारवाई अंबाडकर यांचे मार्गदर्शनात श्री भगत ,उताने,मोहोड,व चालक श्री घरडे यांनी मोलाचे सहकार्य केले .यावेळी डॉ.पिहुलकर,यांनी बरीच धावपळ करत फायर ब्रिगेडसह ईतर यंत्रणांना पाचारण केले .तर सिमा धोटे, देशमुख ,बारमासे,राऊत फॅमिली यांनी त्यांना सहकार्य केले असे स्थानिक अर्जुन नगर येथील नागरिकांनी कळवले आहे.