चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी केंद्रांतर्गत राजना येथील जि.प. शाळा परिसर नुकताच तंबाखू मुक्त घोषित करण्यात आली.
शाळेत तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करुन विविध उपक्रमांचे आयोजन करुन शाळा तंबाखूमूक्त करण्यात आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र कडू , अनिल जळीतकर, सुरेश गौरकार, चंद्रमणी गजभिये,मुकुंदराव गावंडे, दिपाली डुमरे, प्रीती गोसावी, किशोर भगत, शारदा ढेकले , मुख्याध्यापक गणेश वासनकर , भास्कर पिंपळे आदिंचे सहकार्य लाभले..