तेरची ग्रामपंचायत चौकशीच्या पिंजर्यात

0
2074

तेरची ग्रामपंचायत चौकशीच्या पिंजर्यात तेर ग्रामपंचायतीतील गैरकरभराच्या चौकशीचेअप्पर आयुक्ताचे आदेश

हुकमत मुलाणी/ उस्मानाबाद

उस्मानाबाद – तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या तेर ग्रामपंच्यातमध्ये उदभवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ग्रामविस्तार अधिकारी व उपसरपंच यांनी बेकायदेशीर कार्य करीत आहेत त्यांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी लोकनियुक्त मात्र सध्या अपात्र असलेले युवा सरपंच खटावकर यांनी अप्पर आयुक्त यांच्याकडे केली होती त्यामुळे तेरची ग्रामपंचात चौकशीच्या पिंजर्यात अडकण्याची दाट शक्यता आहे आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याने काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेलोकनियुक्त तेरचे युवा सरपंच महादेव खटावकर यांचे पद उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्रतेचे आदेश दिला होता त्याच्या विरोधात खटावकर यांनी मा. अप्पर आयुक्त औरंगाबाद यांचेकडे अपिल केले होते अप्पर आयुक्त यांनी जैसे थे (status quo)आदेश दिले मात्र आदेशपूर्वीच ग्रामविस्तार अधिकारी व बी डी ओ यांनी राजकीय दबावापोटी किरकोळ कायद्याचा आधार घेत म्हणजे ग्रामपंचायत कामकाज सुरू राहण्यासाठी म्हणून अपात्र सरपंचांना कल्पना न देता जावक क्र -199/2018 दि 4-10-2018 रोजी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे उपसरपंच बाळासाहेब कदम यांनी सही नमुना सादर करणे बाबतचे पत्र गटविकास अधिकारी वर्ग 1 यांना दिले व त्यावर दि 30-10-2018 रोजी गटविकास अधिकारी वर्ग 1 यांनी जावक क्र 3425/2018 अन्वये ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांना केवळ ग्रामनिधी अंतर्गत कर्मचारी वेतन व भत्ते मर्यादित दैनंदिन गरजा करिता सही नमुनाचे अधिकार अपिल निर्णयास अधिन राहुन देण्याचे पत्र दिले होते. तरी देखील ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी कर्मचारी नसलेल्या व्यक्तीला कर्मचारी आहेत असे भासवून पेमेंट अदा केले असून त्यांनी जनतेच्या पैसेचा दुरुपयोग व फसवणूक केली आहे. व अंगणवाडी दुरुस्तीचे काम व अंगणवाडी बांधकामाची दोन निविदा काढण्यात आले असल्याची तक्रार खटावकर यांनी अप्पर आयुक्त औरंगाबाद यांचेकडे केली होती. त्यामुळे अप्पर आयुक्त यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तेर ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.राजकीय कुरघोडयत अडकलेल्या तेर ग्रामपंचायतिच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिल्याने पुढे काय होणार की दबावापोटी चौकशी अधिकारी जि प सत्ताधारी याना अनुकूल अहवाल देणार का चौकशीच्या पिंजर्यात आडकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे