माजी आमदार स्व. संजय बंड यांना चांदूर रेल्वेत वाहिली सर्वपक्षीय श्रध्दांजली

0
1106
Google search engine
Google search engine

माजी न.प. सभापती मेहमुद हुसेन यांच्या अध्यक्षतेत सभा संपन्न 

अनेकांनी दिला आठवनींना उजाळा 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

    अजातशत्रु, लोकनेते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार स्व. संजय बंड यांना रविवारी दुपारी १ वाजता सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. शिवसेनेतर्फे आयोजित श्रध्दांजली सभा माजी न.प. सभापती मेहमुद हुसेन यांच्या अध्यक्षतेत स्थानिक हुतात्मा स्मारकमध्ये संपन्न झाली.

      शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार स्व. संजय बंड यांचे १३ डिसेंबरला दु:खद निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्याकरिता रविवारी दुपारी शिवसेनेतर्फे सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी मेहमुद हुसेन होते. सूरूवातीला संजय बंड यांच्या फोटोचे पुजन करून फुले वाहुन श्रध्दांजली देण्यात आली. यानंतर अनंतराव गुढे, वीरेंद्र जगताप, प्रविण घुईखेडकर, मेहमुद हुसेन, नितीन गवळी, गणेश रॉय, नंदु खेरडे, राजेश निंबर्ते, ओंकार ठाकरे, प्रमोद काठाडे, निलेश विश्वकर्मा,  अजय हजारे आदींनी भाषणातुन संजय बंड यांच्या आठवनींना उजाळा दिला. यानंतर शेवटी २ मिनीटे मौन बाळगुन सुध्दा श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेचे संचलन राजेश निंबर्ते यांनी केले.

      यावेळी माजी खासदार अनंतराव गुढे, आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख डॉ. प्रमोद काठाळे, माजी जिल्हाप्रमुख ओंकार ठाकरे, धामणगाव तालुका प्रमुख   निलेश तिवारी, पं. स. उपसभापती देवीकाताई राठोड, डॉ. सुषमा  खंडार, माजी नगराध्यक्ष गणेश राय, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, नंदकिशोर खेरडे, निलेश विश्वकर्मा, प्रहार तालुका प्रमुख  अंकुश खाडे, हेमंत हटवार, नगरसेवक अजय हजारे, मुन्ना शर्मा, विजय मिसाळ, राजू सोनकेे, सुरेश इमले, गजानन यादव, विनय कडू, प्रमोद खवड, स्वप्नील मानकर, रवि दीक्षित, संदीप शेंडे, मोरेश्वर राजूरकर, अरूण कवळकर, भूषण काळे, शरद गोळे, आसिफ पठाण, गोपाल डेहनकर, विनोद बागडे, सचिन राय, राजा वानखडे, प्रशांत  सव्वालाखे, अंकुश पटले, बबलू भोयर, अनिल आठवले, मंगेश भोसले, तूळशिदास सहारे, अरविंद चिलमकर, विजय देशमुख,  अभिजित पाचपोर, अनिल गुळाने,अशोक पांडे,अशोक गावंडे, शुभम डकरे, बाबाराव खोडके, धानेश्वर खडसे, प्रशांत मोहोड, संजय गाढवे, चेतन चोरे, रुपेश गावंडे, अमोल गाढवे, आकाश गावंडे यांसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

उर्दु शाळेचा प्रलंबित प्रश्न संजय बंड यांनी लावला होता मार्गी – मेहमुद हुसेन

    स्व. संजय बंड यांच्या काम करण्याच्या शैलीत कधीच जात – धर्म असा भेदभाव नव्हता. चांदूर रेल्वे शहरातील उर्दु शाळेचा प्रश्न मंत्रालयात प्रलंबित असतांना संजय बंड यांना मी याबद्दल विनंती केली होती. यामध्ये त्यांनी स्वत: जातीने लक्ष टाकुन या उर्दु शाळेचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयीन पाठपुरावा केला. व आज उर्दु शाळा चांदूर रेल्वेत बघायला मिळत असल्याचे मत या सभेत माजी न.प. सभापती मेहमुद हुसेन यांनी व्यक्त केले.