शासकीय निवासस्थाने बनले शौकीनांचा अड्डा – अनैतिक कृत्य चालत असल्याची शहरात चर्चा

0
813
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – ( शहेजाद खान ) 

       चांदूर रेल्वे शहरातील विरूळ चौकाजवळील शासकीय निवासस्थाने आंबट शौकीनांचा अड्डा बनला असुन अनेक अनैतिक कृत्य चालत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. निवासस्थानाच्या कंपाऊंडमध्ये देशी दारूच्या बॉटल, कंडोमचे पॉकीट वृत्तकेसरीच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

       चांदूर रेल्वे शहरातील विरूळ चौकाजवळ मुख्य रस्त्यावर शासकीय निवासस्थाने आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ही बंगले ओस पडली असुन सरकारी बंगले निरूपयोगी ठरली आहे. या बंगल्यावर सरकारी अधिकारी राहत नसुन अमरावतीवरून ये-जा करतात. अनेकवेळा ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणुन दिल्यानंतरही अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. असे असतांना आता या बंगल्याचा उपयोग आंबट शौकीन घेत असल्याचे दिसत आहे. या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याचे समजते. एका शासकीय निवासस्थानाच्या कंपाऊंडमध्ये देशी दारूच्या बॉटल आढळल्या असुन सोबतच कंडोम पॅकेटसुध्दा आढळून आले आहे. यावरून याठिकाणी अनेक अनैतिक कृत्य चालत असल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगु लागली आहे. आजुबाजुला मोठमोठी झाडे असुन या बंगल्याच्या आजुबाजुला कोणीही येत नाही. याचाच फायदा अनेक शौकीन घेत असल्याचे समजते. मुख्य मार्गावर ही शासकीय बंगले असतांना कोणालाही सदर प्रकार लक्षात येत नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यालयी राहण्याची सक्ती केव्हा ? 

शासकीय निवासस्थानाचा उपयोग अधिकाऱ्यांऐवजी आंबट शौकीन घेत असल्यामुळे ही चांदूर रेल्वे शहरासाठी दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल. त्यामुळे आता तरी या शासकीय निवासस्थानात सर्व सोई – सुविधा पुरवुन अधिकाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी जेणे करून शासकीय बंगल्याचा उपयोग शासकीय अधिकाऱ्यांनाच होईल अशी मागणी जोर धरत आहे. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाईचा बडगा उगारणे सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.