के.सी.ई. मध्ये साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0
957
Google search engine
Google search engine

जळगाव :-

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ….अशा शब्दात जगाला समतेचा एकात्मतेचा संदेश देणारे परमपूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त के.सी.ई. सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील , ए. टी. झांबरे विद्यालय तसेच अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अध्यापक विद्यालयाच्या अध्यापकाचार्य शालिनी तायडे , हेमलता चौधरी , साधना झोपे , मुख्या. दिलीपकुमार चौधरी , रेखा पाटील आदींच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यांनतर केसीई संस्थेने प्रकाशित केलेल्या मातृहृदयी साने गुरुजी लिखित भारतीय संस्कृती या पुस्तकावर आधारित मनोगत अथर्व ब्राह्मक्षत्रिय व सुजल चौधरी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. भारतीय संस्कृती कर्ममय आहे .यात कर्माला प्राधान्य आहे.या संस्कृतीला आळस खपत नाही.या संस्कृतस कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही.आपल्या संस्कृतीत कर्माचा महिमा वाढविलेला असून त्याचे साधने सुद्धा पवित्र मानलेली आहेत अशा शब्दात मुख्या.रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कर्माबद्दल माहिती सांगितली. त्यांनतर विद्यार्थ्यांची भारतीय संस्कृती या पुस्तकावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले.तर यशस्वीतेसाठी उपशिक्षिका सरला पाटील, कल्पना तायडे, दिपाली चौधरी, नेमीचंद झोपे, स्वाती पाटील, सुधीर वाणी , प्रणिता झांबरे, डी. ए.पाटील ,बिपीन झोपे आदींनी परिश्रम घेतले.
प्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ,अध्यापकाचार्य , छात्रध्यापक ,विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.