लोकजागर मंच द्वारा विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिकेचे लोकार्पण

0
1371

विद्यार्थ्यांनो घ्या भरारी लोकजागर तुमच्या पाठीशी – संस्थापक अनिल गावंडे

अकोट/ संतोष विणके

शिक्षणासह विविध रचनात्मक उपक्रमांना महत्व देणाऱ्या लोकजागर मंच द्वारा विद्यार्थ्यांच्या सोईसाठी निशुल्क अभ्यासिकेचे दि.23 डीसे. लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिनधास्त भरारी घ्यावी लोकजागर मंच सदैव तुमच्या पाठीशी आहे असे अभिवचन लोकार्पण प्रसंगी लोकजागरचे संस्थापक अनिल गावंडे यांनी आज येथे केले .
स्थानिक शिवाजी विद्यालया जवळील टाकपुरा येथे लोकजागर मंच द्वारा निशुल्क स्पर्धा परीक्षा अभ्यासिका तालुक्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवेत आजपासून सुरू करण्यात आली. यावेळी लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी फीत कापून अभ्यासिकेचे लोकार्पण केले. यावेळी ऍड. सुधाकर खुमकर, पुरुषोत्तम आवारे , मंच चे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, कार्याध्यक्ष राजेश गावंडे, सुरज शेंडोकार, तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल जळमकर, योगेश जायले, आकाश बरेठिया, अर्जुन गाळखे, अमित डोबाळे, अभिजित कोकाटे, आनंद रोडे पाटील, श्रीजित गडम, आशिष उकळकर, चांकी रोहणेकर,श्याम पाथ्रीकर,
निखिल राऊत, अक्षय मामनकार, ऋषिकेश कुकडे, अंकुश झास्कर, मुकुंद मामनकार, पंकज सोळंके, विशाल सोळंके, हर्षल अस्वार, प्रशांत मेंढे, योगेश सुरडकर, शुभम थोरात, शिवा दिंडोकार यांच्यासह लोकजागर मंचचे पदाधिकारी,सदस्य व बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते. ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या अद्यावत पुस्तकांनी सुसज्ज असून सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. त्याचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे अनिल गावंडे यांनी याप्रसंगी सांगितले.