ट्रक क्रूझर गाडीच्या धडकेत 9 जण ठार 8 जण गंभीर जखमी – सगळे कळंब तालुक्यातील पारडी या गावातील रहिवासी

0
2499
Google search engine
Google search engine

यवतमाळ-

यवतमाळ कळंब मार्गावरील चापर्डा या गावाजवळ आज भीषण अपघात झाला , अपघात
एवढा भीषण होता की क्रुझरचा पार चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच गावक-यांसह कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमी आठ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.