बेकायदेशीर कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा विरोध ; उद्या लातूर येथील झोन कार्यालयासमोर द्वारसभा

0
1054
Google search engine
Google search engine

बेकायदेशीर कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा विरोध ;
उद्या लातूर येथील झोन कार्यालयासमोर द्वारसभा

उस्मानाबाद,
महावितरण कंपनीत बेकायदेशीररित्या प्रस्तावित असलेल्या कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही प्रक्रिया रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवार, 28 डिसेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांसाठी लातुरात असलेल्या झोन कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने द्वारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीतील प्रस्तावित कर्मचारी पुनर्रचना रद्द करावी, तिन्ही वीज कंपन्यांमध्ये र्नित असलेली 30 टक्के मंजूर पदे मागासवर्गीयांच्या अनुशेषांसह कामाचे निकष व वाढती जबाबदारी लक्षात घेवून तत्काळ भरावीत, महापारेषण कंपनीतील नवीन आकृतीबंध हा तंत्रज्ञ श्रेणीमधील कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करीत असताना कुठल्याही संवर्गातील मंजूर पदसंख्या कमी करण्यात येवू नये, महापारेषण कंपनीत नवीन आकृतीबंधानुसार अतिर्नित ठरणार्‍या पदांचे समायोजन करून वरिष्ठ वेतनश्रेणीच्या लाभासंदर्भात अॅनॉमली दूर करण्यात यावी, महावितरण कंपनीतील तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचार्‍यांचे कामाचे तास निश्चित करून अतिर्नित कामाचा मोबदला देण्यात यावा, गटविमा योजनेचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार वीज कर्मचार्‍यांवर न लादता या योजनेंतर्गत पाच लाख रूपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकिय सेवेचे फायदे वीज कंपन्यांनी स्वत:च्या महसुलातून द्यावे, महानिर्मिती कंपनीमध्ये चालू स्थितीत असलेले कोणतेही संच बंद करण्यात येवू नये. तसेच लघुजलविद्युत केंद्र खासगी भांडवलदारांकडे सोपविण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रकरणे निकालात काढण्यात यावी, आदी मागण्यांसाठी लातूर येथील झोन कार्यालयासमोर सायंकाळी 5.30 वाजता द्वारसभा होणार आहे.
या द्वारसभेस मागासवर्गीय विद्युत कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी आगवाने, सचिव बापू जगदे, गौतम मोटे, दत्ता पौळ, निशीकांत संगवे, सचिदानंद सगर, सचिन शिंदे, तानाजी मर्डे, बॅरिस्टर कपाळे, गणेश जमादार, सुदाम ओव्हाळ, संजय माळाळे, इम्रान शेख, महेंद्र शिनगारे आदींनी केले आहे.