मनसेच्या वतीने आकोटात आंतरराष्ट्रीय वक्ते राज काळे (मुंबई) यांची निशुल्क प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा

0
1924

आकोट/संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रविराज फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अकोट शहरात उद्या दिनांक 30 डिसेंबर 2018 ला शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय वक्ते श्री राज काळे (मुंबई) यांच्या मोफत व्याख्यान व प्रशिक्षण वर्ग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व रविराज फाऊंडेशनचे संस्थापक तथा आयोजक रवींद्र फाटे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते तथा सोशल ट्रेनर राज काळे यांनी आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाले असून त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळे द्वारा आतापर्यंत हजारो युवक युवतींच्या आयुष्यात बदल झाले आहे. अशा जागतिक दर्जाच्या व्याख्यानाचा अकोट तालुक्यातील विद्यार्थी, युवक-युवती यांना लाभ घ्यावा म्हणून 30 डिसें 2018 ला स्थानिक झुंनझुनवाला अतिथीगृह येथे दुपारी एक वाजता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .या कार्यक्रमासाठी गेल्या एक वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून तारीख मिळवण्यासाठी आयोजक प्रयत्नात होते.या देशाचा युवा हा वैचारिक दृष्ट्या सक्षम व्हावा लोकशाही व्यवस्थेत त्याचे स्थान हे सर्वव्यापी व्हावे म्हणून रवीराज फाउंडेशनने युवावर्गासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.राज काळेंच्या कार्यशाळांना हजारो रुपये फी असताना शहरातील युवावर्गासाठी ही संधी आयोजकांच्यावतीने निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थीवर्गासाठी एंट्री पासेस ठेवण्यात आल्या असून या पास करिता संपर्क रविंद्र फाटे,(9325676267) श्री श्रींरंग तट्टे,शशांक कासवे,अजय शर्मा,शुभम देशपांडे,तेजस लेंघें,यांच्याशी आपण मनसे संपर्क कार्यालय हॉटेल ड्रीमलॕंन्ड समोर,हीवरखेड रोड येथे संपर्क करावा