आंतरराष्ट्रीय वक्ते राज काळे यांचा “पासवर्ड आनंदी जीवनाचा ” कार्यक्रम संपन्न .

0
1387
Google search engine
Google search engine

मनसे व रवीराज फाउंडेशनचे आयोजन

आकोट/ संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रविराज फाउंडेशन यांनी आकोट शहरात आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय वक्ते राज काळे यांचा “पासवर्ड आनंदी जिवनाचा “कार्यक्रम श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात पार पडला. स्थानिक झुनझुनवाला अतिथी भवन येथे दि.30 डीसे,रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री.भाष्कररावजी महल्ले हे होते . कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.श्री.उदयसिंगजी राजपुत (SDM अकोट ) .तर प्रमुख पाहुणे नायब तहसिलदार राजेश गुरव व रवीराज फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र फाटे हे होते.

स्थानिक
विद्यार्थी व नागरीकानी या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला . दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आला.आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले.यावेळी
कार्यक्रमाचे आयोजक रविंद्र फाटे यांनी प्रास्ताविक तथा वक्त्यांचा परीचय दिला.तसेच नागरिक व विद्यार्थी वर्गाने कार्यक्रमाला उदंड उपस्तिथी दिल्या बद्दल आभार मानले.

तिन तासापेक्षा अधिक वेळ रंगलेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय वक्ते राज काळे यांनी सकारात्मक जगण्या संदर्भात अनेक तथ्थे मांडुन श्रोत्यांना हसवत अंतर्मुख केले.तर श्रोत्यांनीही आपल्या मनातील अनेक प्रश्नाना राज काळे यांच्या कडुन शंका निरसन करुन घेतले.मनसेने आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमांचे रसिकांनी भरभरुन कौतुक केले.

सभागृह यावेळी खचाखच भरले होते .तर कार्यक्रमाला महीलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.दरम्यान कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दणाणुन गेले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक रविंद्रजी फाटे ( मा.जिल्हाअध्यश मनसे ) श्रीरंग जी तट्टे , शशांक कासवे , धनराज गावंडे , शुभम देशपांडे ,शाकिर खान, तेजस लेंघे , आकाश जगताप , अमित चव्हान ,अमित दुबे,पियुष बाळापुरे,अक्षय गांवडे , पुष्पक चेडे ,रविंद्र गांवडे ,पवन नेरकर , बबलु हरणे , विक्की सावरकर ,शाम आतकड,निकिता अढाऊ, शारायू ढगेकर , हर्षल भंडारी व मनसे ची टिम यांनी परिश्रम घेतले .
हि माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली.