राज्यमंत्री दर्जा प्राप्त आ.श्रीकांत देशपांडे यांची लोकजागर मंच ला सदीच्छा भेट

0
903

आकोट/ प्रतीनिधी

आ.श्रीकांत देशपांडे यांनी अकोट दौऱ्यात आज दि,2 जाने.ला लोकजागर मंच कार्यालयास सदीच्छा भेट दिली. ते एका कार्यक्रमासाठी अकोटला आले असता त्यांनी लोकजागर मंच कार्यालयास भेट देत मंच करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेतली व मंचच्या लोकाभिमुख कार्याची स्तुती केली.

आमदार देशपांडे यांची नुकतीच राज्य सरकारने राज्य शिक्षण हक्क परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली असून त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला त्याबद्दल यावेळी त्यांचा लोकजागर द्वारा सत्कार करण्यात आला.यावेळी मंचाचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,शहर अध्यक्ष सुरज शेंडोकार,योगेश जायले,राजू गावंडे,अर्जुन गाळखे,यांनी देशपांडे यांचे स्वागत केले.तसेच
मा. ना.श्रीकांतभाऊ यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी
जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, शहराध्यक्ष सूरज शेंडोकार, राजेश गावंडे, योगेश जायले, अर्जुन गाळखे,आकाश बरेठिया, अभिजित कोकाटे,सूरज किटके, चेतन गुरेकार, अक्षय मामनकार,श्याम लटकुटे, विशाल मामनकार,अक्षय मोकाशे,शाम राठी, केशव लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.