पत्रकार कमल किशोर भगत यांची अभिनव दिनदर्शिका

0
1097
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके

जिकडे तिकडे कॅलेंडरचा सुळसुळाट झाला असताना थोडी आकडेमोड करून क्षणार्धात दिलेल्या तारखेचा वार काढण्याची सोय उपलब्ध करून देणारी अभिनव दिनदर्शिका शहरातील पत्रकार एलआयसी विमा प्रतिनिधी कमल किशोर भगत यांनी तयार केली आहे.३० वर्षापासून दरवर्षी अशा प्रकारची दिनदर्शिका तयार करीत अवघ्या एक दोन क्षणात आपल्याला कसं 2019 या वर्षातील कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही तारखेचा वार यादी ह्या दिनदर्शिके द्वारे समजू शकतो विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी व थोडे मनोरंजन व्हावे तर्क शक्तीचा विकास व्हावा या दृष्टीने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे

सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने दिले आहेत प्रत्येक महिन्याच्या खाली त्या महिन्याचा नंबर दिलेला आहे ज्या महिन्यातील ज्या तारखेचा वार काढावयाचा असेल ती तारीख त्या महिन्याच्या खाली दिलेल्या अंकात मिळवायची व येणाऱ्या बेरजेला ७ ने भागावे त्यानंतर बाकी उरत असेल त्यावरून आपण ठरवु शकतो उदाहरणार्थ एक बाकी असेल तर सोमवार 2 असेल तर मंगळवार 3 बुधवार चार गुरुवार पाच शुक्रवार सहा असेल शनिवार बाकी शून्य असेल तर रविवार समजावा 15 ऑगस्ट या तारखेचा वार काढावयाचा असेल तर 15 ऑगस्ट महिन्याचा दिलेला नंबर 3 यांची बेरीज येईल अठरा या बेरजेला 7 ने भागले असता चार बाकी उरते म्हणजेच 15 ऑगस्ट गुरुवार असला पाहिजे अशी माहिती भगत यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.