समाजा मध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सतत कार्यरत – पोलीस निरीक्षक गजानन शेळके

0
736

जागेश्वर विद्यालयात पोलीस उदय दिनाचे आयोजन

अकोला/प्रतिनीधी

समाजा मध्ये शांतता व सुवयवस्था टिकवून ठेवून सुरक्षिततेची भावना वृद्धीगत करण्या साठी महाराष्ट्र पोलीस सतत कार्यरत असल्याचे प्रतिपादन बाळापूरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले, ते जागेश्वर विद्यालयात पोलीस उदय दिवसा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते, ते पुढे बोलतांना म्हणाले सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे, सद् प्रवृत्तीचे रक्षण व वाईट प्रवृत्तीचे दमन करण्या साठी मूठ भर पोलीस दलाला जनतेची साथ आवश्यक असते, तरच ते आपले काम सक्षमतेने करू शकतात,

12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्या साठी 1लाख 85 हजार पोलीस व 15 हजार अधिकारी असे फक्त 2 लाख पोलीस बळ उपलब्ध आहे, त्या मुळे पोलिसांना जनतेची साथ आवश्यक आहे, त्या साठी जनतेचा पोलिसांवर विश्वास असणे गरजेचे आहे, हा विश्वास वाढविण्या साठी पोलीस उदय दिवसाच्या निमित्ताने आपल्या समोर आल्याचे त्यांनी जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले, पोलीस स्थापनेचा इतिहास, पोलीस दलाची रचना व भरतीच्या पद्धती बाबत मार्गदर्शन करून लहान मुलांचा गुन्हेगारी कडे वाढत असलेला कल बघता त्या मागची कारणे स्वतः चा अनुभव सांगून त्यांनी पटवून दिले, ह्या वेळी वाडेगाव चौकीचे साहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, जागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मानकर, पदाधिकारी, शिक्षक व शेकडो च्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.