वरुड आगाराच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत ! दापोरी येथे  सुपर थांबा असून बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल ! बस सेवा ठरत आहे विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी !

0
1517
Google search engine
Google search engine

दापोरी येथे सुपर थांबा असून बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल !

बस सेवा ठरत आहे विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी !

वरुड आगाराच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत !

विभाग नियंत्रकाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली !

विशेष प्रतिनिधी :

मोर्शी तालुक्यातील दापोरी हे गाव जवळपास ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला सालबर्डी तिर्थक्षेत्रासह आसपासची ५ गावे जुळलेली आहेत. येथून शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे दापोरी पासून डोंगर यावली घोळदेव सालबर्डी तीर्थक्षेत्र असून रोज शेकडो भाविक , प्रवासी व विद्यार्थी दापोरी येथून प्रवास करतात. त्यामुळे रूपेश वाळके यांच्या विशेष प्रयत्नाने विभाग नियंत्रक राज्य परिवहन अमरावती यांचे पत्र क्रमांक राप/अम/विनी/वाह/चालन/२७२१ दिनांक ०७/१०/२०११ नुसार दापोरी गावाला सुपर एस् टी बस थांबा मिळाला असून दापोरी येथे सुपर बस थांबत नसल्यामुळे वरूड मोर्शी आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे .

पण शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जाणार्‍या विद्यार्थ्यांचा घोडका पाहून वरुड आगाराचे बस चालक अधिक वेगाने बसेस दामटवतात. परिणामी विद्यार्थ्यांना तासनतास दुसर्‍या बसची वाट पाहत येथे उभे राहावे लागते. आणि विद्यार्थ्यांजवळ पासेस असून सुद्धा जीव धोक्यात घालून खासजी वाहनाने प्रवास करावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून वाहकांच्या असभ्य वागणुकीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वरुड आगाराच्या अशा बसचालकावर कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थी व कर्मचारी वर्गातून होत आहे.

वरुड – अमरावती मार्गावरील धावणार्‍या बस दापोरी बस थांब्यावर थांबतच नाही . दापोरी येथून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात.
त्यामुळे विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात. तसेच याच वेळेवर काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोर्शी , वरुड , अमरावती , जरुड , बेनोडा , हिवरखेड येथे जातात.
नौकरदार वर्गांचीही कामावर जाण्याची गर्दी असते. त्याचप्रमाणे सालबर्डी येथे तीर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक दर्शनाला जाण्याकरिता दापोरी येथे थांबतात मात्र अनेकदा बसेस दापोरी बस थांब्यावर थांबत नाही. तर काही बसेस विद्यार्थ्यांचा घोळका पाहून बसेस न थांबविता आणखी वेगाने दामटवितात. त्यामुळे प्रवाश्यांना व विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
दापोरी येथे सुपर बसेसचा थांबा सहा वर्षा आधी मिळाला आहे. मात्र महामंडळांचे वाहक व चालक बसेस थांबविण्यात दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे परिवहन विभागाने लक्ष देत अशा वाहक वा चालकांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी विद्यार्थी, नागरिक आणि नोकरदार वर्गातून करण्यात येत आहे .
या गंभीर विषयाबाबत विद्यार्थ्यांनी आगारप्रमुख यांना अनेक तक्रारी केल्या असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसून दापोरी येथे बस थांबा विभाग नियंत्रक यांच्या लेखी आदेशानुसार मंजूर झाला असून दापोरी येथे सुपर बसेस थांबत नाही त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. परंतु अद्यापर्यंत दापोरी येथे वरुड आगराच्या सर्व बसफेरीचे चालक बस थांबवित नसून विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मोर्शी येथून विद्यार्थी वरुड आगाराच्या बस मध्ये बसल्यास काही वाहक त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन उतरवून देतात , आणि विद्यार्थी बस मध्ये बसल्यास त्यांना मधेच उतरवून देण्याच्या अनेक घटना घडल्या असून वरुड आगारा प्रति विध्यार्थ्यामध्ये रोष व्यक्त होतांना दिसत आहे , त्यामुळे दापोरी येथे सर्व सुपर बसेस थांबविण्यात याव्या त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास उशीर होनार नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यामुळे वरुड आगाराने या गैरसोयीची दखल घेत दापोरी येथे सर्व सुपर बसेसना थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे .तसे न झाल्यास दापोरी परिसरातील विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभाग या गंभीर विषयावर काय कार्यवाही करतात याकडे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे .

शाळेसाठी पायीच जातात विद्यार्थिनी !
गावोगावी बसेस पोहोचल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग काही प्रमाणात का होईना मोकळा झाला आहे. पण ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही विद्यार्थ्याना पायीच इतर गावात शाळेत जावे लागते. कधी बस नसल्यामुळे तर कधी पैशाचा अभाव अशी एक ना अनेक कारणे यामागे आहेत.
दापोरी परिसरातील डोंगर यावली घोळदेव , भाईपुर , मायवाडी आदी भागातील विद्यार्थ्यांना व त्यातही विद्यर्थिनीना पायीच चार ते पाच किलोमिटर जावे लागत असल्याचे दिसत आहे . एकमेकांच्या सहकार्याने या मुलीचा शाळेचा पायदळ प्रवास करतात. ही बाब ध्यानात घेत महामंडळाने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.भाईपुर , मायवाडी बस थांब्यावर बसेस येत असल्या तरी जाताना व येतांना सुपर बसेस थांबत नाहीत. अशा वेळी सर्वसाधारण बस केव्हा येईल याचा पत्ता नसल्याने विद्यार्थी पायीच गावी जाण्यास प्राधान्यही देतात.