दलितमित्र श्री.संपतराव बापु पवार यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड.!

मा.विजयकुमार काळम पाटील,सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांनी श्री.संपतराव पवार यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड केली आहे.सदर निवडीचे पत्र श्री.संपतराव पवार यांना नुकतेच प्राप्त झाले.श्री.संपतराव पवार हे कडेगाव तालुक्यातील शिवणी गांवचे रहीवाशी होत सध्या कडेगांव मध्ये रहात आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये 36 वर्षे सेवा केली. शासनाच्या कालनियमानुसार 31 मे 2013 रोजी सेवेतुन सेवामुक्त झाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी लाईफ मेंबर, लाईफ वर्कर आणी समन्वय समितीचे सदस्यपद अशी सन्मानाची विविध पदे भुषविली आहेत.31 मे 2013 रोजी विटा हायस्कुल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर काँलेज विटा येथुन प्राचार्य पदावरून सेवामुक्त झाले.एकुण सेवाकालावधी मध्ये सांगली जिल्हा परिषदे मार्फत “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्थेने “उत्कुष्ट सेवा पुरस्कार” देऊन सन्मानीत केले.सेवा काळामध्ये विविध ग्रामपंचायतीनी “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानीत केले आहे.एस.एस.सी बोर्डा मध्ये परिक्षक, नियामक, मुख्य नियामक व प्राश्निक अशी विविध सन्मानाची पदे भुषविली आहेत.ऊपराकार लक्ष्मण माने यांचे बरोबर महाराष्ट्र भटक्या विमुक्त संघटने मध्ये 20 वर्षे काम केले आहे. सेवाकाळात आणी सेवा समाप्तीनंतरही समाजप्रबोधन आणि समाजप्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविले. व्यसनाधिनते पासुन परावृत्त करणे, कुटुंब नियाेजनासाठी प्रोत्साहीत करणे, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करणे, कोणत्याही विधीसाठी दारूची प्रथा बंद करणे, सामुदायीक विवाह सोहळा , समाजामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा पाठपुरावा करणे, 60 वर्षाच्या पुढील वृध्दांना आधारकाढीची मदत करणे , समाजातील इ.10 वी इ.12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ झालेल्या गुणवंतांचा सत्कार करणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे अशा प्रकारच्या या सामाजीक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नोंद घेऊन श्री पवार यांना दि-26/06/2013 रोजी “दलितमित्र” , “डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार” देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानीत केले आहे.जिल्हा परिषद सांगलीचे अध्यक्ष – मा. श्री.संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार मा. श्री.पृथ्वीराज देशमुख, माजी भाजपा अध्यक्ष मा. श्री.राजाराम गरूड, मा. श्री.चंद्रसेन देशमुख, मा.श्री.धनंजय उर्फ भैया देशमुख, मा.श्री.उदय देशमुख, मा. श्री. विजय गायकवाड कडेगांव यांनी वरील निवडीबद्दल अभिनंदन केले. तसेच तमाम मान्यवरांनी व नंदिवाले समाजातील तमाम बंधु आणि भगिनी अभिनंदन करित आहेत.