पानी फाउंडेशन आलं गावात !

0
1288
Google search engine
Google search engine

पानी फाउंडेशन आलं गावात !

पाणी फाउंडेशन आलं महाराष्ट्रात
झाला गजर गावा – गावात
चला पेटवूया मशाल हातात
घडवू बदल साऱ्या जगात

पानी फाउंडेशन आलं गावात
झाली श्रमदानाला सुरुवात
करू पानीदार प्रत्येक गाव
असा मनी घेऊया ध्यास

पानी फाउंडेशन आलं गावात
झाली जलक्रांतीला सुरुवात
लावू झाडंही असंख्यात
देऊ आव्हान दुष्काळास

पानी फाउंडेशन आलं गावात
नाही राहिली चिंता मनात
जीवन जगेल शेतकरी सुखात
असा विश्वास आहे मनात

पानी फाउंडेशन आलं गावात
चला करूया नमन धरतीस
देऊ मात प्रत्येक अडचणीस
घडवू दुष्काळमुक्त महाराष्ट्र !

कु. पूजा वानखडे
मु हिवरा मुरादे पो. पिंपरी निपाणी ता नांदगाव खंडेश्वर जी अमरावती .