एकाच गावात २४ तासात दोन शेतकर्याच्या आत्महत्या उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील घटना

0
1472
Google search engine
Google search engine

एकाच गावात २४ तासात दोन शेतकर्याच्या आत्महत्याउस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील घटना

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील एकाच गावात २४ तासात दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेतालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकर्यांनी नापीकी व कर्जबारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे एका शेतकर्याने स्वताच्या पँटवर लिहून तर दुसर्या शेतकर्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तावरजखेडासह परिसरात खळबळ उडाली आहे.तावरजखेडा येथील शिवाजी जनार्धन सगर वय ५५ वर्षे यांनी ता २/१/२०१९ ( बुधवारी) स्वताच्या शेतात पँटवर मी कर्जबारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आहे.असे लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली तर ता ३/१/२०१९ ( गुरुवार) रोजी तावरजखेडा येथीलच श्रीपती गंपू फेरे वय ४७ वर्षे यांनी चिठ्ठी लिहून विमल सुरवसे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. फेरे यांनी चिठ्ठीत मला पाच मुली आहेत .शेतात एक दाणाही पिकला नाही म्हणुन आत्महत्या करत आहे आसे लिहले आहे . घटनेची माहिती ढोकी पोलिसांना समजताच ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे .फेरे यांना पाच मुली आहेत त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे कुटूंबावर मोठे संकट आले आहे.तर सगर यांनही एकच मुलगा आहे त्यामुळे त्यांचीही परस्थीती हालाखीचीच आहे.या दोन्ही शेतकर्यांची ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात म्रत्युची नोंद करण्यात आली आसून पुढील तपास ढोकीचे पोलिस करत आहेत.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहेराज्यकर्ते व विरोधक आगामी निवडणुका डोळयासमोर ठेऊन कुरघोडयाच्या राजकारणात व्यस्त आहेत दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत . नापीकी , कर्जबाजारी व कुंटूबाचा उदरनिर्वाह या चिंतेने ग्रासलेल्या एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी अवघ्या २४ तासात मृत्युला कवटाळल्याची ऱ्हदयस्पर्शी घटना नविन वर्षाच्या सुरुवातीलाच उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथे घडली आहे .राज्यात सर्वत्र तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन दिवसेंन दिवस दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत . राज्यकर्ते केवळ राजकीय स्वार्थासाठी दुष्काळ जाहिर करून राजकिय कुरघोडीत व्यस्त असल्याने कुठल्याही उपाययोजना सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्याप पोहचल्या नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण वाढत आहे .पाऊस न पडल्याने शेतात नापीकी तसेच डोक्यावर कर्जाचा भला मोठा डोंगर , घरात लग्नाच्या पाच मुली यामुळे चिंताग्रस्थ असलेल्या व फसव्या घोषणाबाज सरकारची कसलीही मदत मिळत नसल्यामुळे नविन वर्षाच्या सुरुवातीलाच उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडाच्या दोन शेतकऱ्यांनी अवघ्या २४ तासात आत्महत्या केल्याची ऱ्हदयस्पर्शी घटना घडली आहे .उस्मानाबाद तालुका व जिल्ह्याच्या हद्दीवरील तावरजखेडा येथील ५५ वर्षीय शेतकरी शिवाजी जनार्धन सगर यांनी २ जानेवारी संध्याकाळच्या सुमारास तर ४७ वर्षीय शेतकरी श्रीपती गंपु फेरे यांनी ३ जानेवारी रोजी बँकेचे कर्ज व फायनान्सचे कर्ज शेतातील नापिकी कुटूबाचा उदरनिर्वाह या चिंतेने आत्महत्या केली तर एकाने स्वतःच्या पॅन्टवर दुसऱ्याने कागदावर आपल्या व्यथा मांडल्या तरी देखील अद्याप पर्यंत कुठलाही प्रमुख पुढारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटूंबाची साधी भेटसुध्दा न घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे१९७२ च्या दुष्काळा पेक्षा हि हा दुष्काळ तीव्र आहे गेल्या ५ वर्षात जवळ पास ६०० शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे तर २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील १२८ शेतकऱ्यांनी कर्जामुळे आपली जिवन यात्रा संपवली आहे दुष्काळा बाबत शासन फक्त घोषणा करत आहे उपाययोजना काहीच नाहीत शेतात काही पिकत नाही आणि पिकलच तर भाव नसल्यामुळे विकत नाही या असमतोल परस्थिती मुळे उस्मानाबाद जिल्हयातील शेतकरी आपले जिवन संपवत आहेतदुष्काळा मध्ये उपाययोजना म्हत्वाच्या आसतात कर्ज वसुली थांबली पाहिजे हाताला काम व हातात दाम पाहिजे पण तसे काहि दिसत नाही हे विशेष आहे