अमरावती ब्रेकिंग :- तिवसा – सातरगाव रोडवर एस.टी. बस उलटली ५२ प्रवासी जखमी

0
3333
Google search engine
Google search engine

तिवसा –

अमरावती जिल्ह्यातील तिवसा वरून सातरगावमार्गे चांदूर बाजारकडे एस. टी. बस जातांना अचानक समोरून एक टाटा एस हा दुचाकीला ओव्हरटेक करीत समोर येताच त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एस.टी. बस रस्त्याच्या खाली तोल जाऊन पलटी झाली. ज्यामुळे फुल भरलेल्या बस मधील जवळपास ५२ प्रवासी यामध्ये जखमी झाले. त्यापैकी २१ गंभीर जखमींना उपचारार्थ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन उर्वरीतांना तिवसा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची घटना घडताच सर्व प्रशासकीय यंत्रनेनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरु केले.

*

गंभीर जखमी

बालाजी खैरकार(70), संगीता विलास अवघड (75,बऱ्हाणपूर), संगीता रा.वानखडे, रिता टिचकले, योगेश देवरे, निखिल राऊत(14,शेंदोळा), पल्लवी शेखार(22), माधव भलावी (49,रा.शिरलस), प्रजवल लांडे (19,सातरगाव), माणिक बकराम बेहरे (70,पुणे,ह मु नेरपिंगलाई), पुरुषोत्तम किसन राऊत (72,नेरपिंगलाई), वैष्णवी विजय ठाकरे (20,रा.राजूरवाडी), शीतल विनोद गोरे (21,ममदापुर), कृष्णा विनोद गोरे (3 ममदापुर), हरिभाऊ टेकाडे (55,सातरगाव), वृषाली शरद गावंडे (धामणगाव काटपूुर), प्रिया शंकर टेकाम (19,राजूरवाडी), गुंजन शरद गावंडे(10), जयश्री टुणूकले, निलेश राऊत (14,करजगाव), विजया संजय टिचकले (35)

*किरकोळ जखमी*

शुभांगी शिवानंद देशमुख (19,सातरगाव), सविता वामन होले (21,राजूरवाडी), दिलीप गणपत फुसे (46,नेरपिंगलाई), शांताबाई ज्ञानेश्वर नागरीकर (70,तलेगाव ठाकूर), मुक्ता प्रभाकर बेले (63,तळेगाव ठाकूर), निलेश सनेश्वर (27,पोरगव्हाण), मनीषा निलेश सनेश्वर (22,पोरगव्हान),हरिभाऊ सूर्यभान होले (85,राजूरवाडी),सगणेश सूर्यभान मेंढे (60,रा.नेरपिंगलाई), जानराव सहारे (50,आमला विश्वेश्वर), मंदा जानराव सहारे (50,आमला), मीना किरण चौधरी (55,शिरलस), अलका अशोक चौधरी (57,शिरलस), प्रभा शंकर डोहने (30,निंभारणी), सविता गणेश बोदरे (21,खेडी,ता.नरखेड), दिपक रामहरी ईसळ (42,निंभारणी), संतोष राघोजी तंबाखे (39,वरुडा), मंदा विठ्ठल विधळे (60,माधान), प्रतिभा गजानन इंगोले (48,बोराळा), मिना गजानन बुरघाटे (45,वाठोडा), शिवानी जयवंत विधळे (21,जवळा शहा.), नीलिमा प्रमोद काळे (48,रा.सांगलुद अंबादेवी,अकोला), सुनीता जयवंत विधळेल(47,जवळा शहापूर), नामदेव इंगळे(55,अनकवाडी), अर्पित संजय टिचकले (15,सातरगाव), ज्योती अशोक गायकवाड (35,चेनुष्टा), वृषाली बाबाराव वानखडे (20,राजूरवाडी), दिपाली अशोक तवाने (20,राजूरवाडी), पल्लवी सुरेशआप्पा चौधरी (20,सातरगाव), आरती मनोहर धानोरकर (20,सातरगाव), विमल भिमराव देशमुख (83,काटपुर धामणगाव), अविनाश पंजाब पाटील(40,शिराळा, वाहनचालक), रामेश्वर सुखदेव पवार(28,रा.विचोरी, वाहक)