जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी उत्क्रृष्ठ कर्मचारी पुरस्कार योजना राबविणार. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख

.सांगली जिल्ह्यातीलकडेगांव पंचायत समिती येथे कडेगांव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी (पाणी पुरवठा नोकर, शिपाई, लिपिक) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते.यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रंथामध्ये पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सविस्तर जाणुन घेवून त्या अनुषंगाने प्रशासनास कार्यवाही बाबत सविस्तर सुचना दिल्या.या सभेत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणारा गावातील प्रमुख कर्मचारी आहे.प्रशासनाचा सामान्य नागरीका पर्यंत पोहचणारा घटक म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी आहे.याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा परिषदेस दिव्यांग मित्र अभियान,आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम राबविणे सुलभ गेले.जिल्हापरिषदेस मिळालेला प्रत्येक पुरस्कार हा या ग्रामपंचायत कर्मचारी कामकाजामुळेच मिळाल्याची भावना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केली.जिल्हास्तरावर विविध संवर्गाना पुरस्कार देऊन गौरविले जाते.परंतु ग्रामपंचायत कर्मचारी आज अखेर दुर्लक्षित राहिला आहे हे लक्षात घेऊन जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर उत्क्रृष्ठ ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार राबविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी या सभेत केली यावेळी कडेगांव पंचायत समितीच्या सभापती सौ.मंदाताई करांडे उप सभापती रविंद्र कांबळे गट विकास अधिकारी राहुल देसाई पंचायत समितीच्या सदस्या सौ.स्मिता महिंद, तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.