लोकजागर मंच ने केला आकोटातील पत्रकारांचा गौरव

0
1047
Google search engine
Google search engine

लेखनीच्या शीलेदारांना लोकजागरची मानवंदना

आकोट/संतोष विणके

लोकजागर मंचने पत्रकार दिनाच्या निमित्याने आकोटातील पत्रकारांचा गौरव केला. एकटेपणाने झुंजणाऱ्या पत्रकारांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. माध्यमातील लिखाणाने समाजात निश्चित बदल घडत असतात. प्रामाणीक पत्रकारांना बळ दिले पाहिजे, समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे या भावनेतुन अनिल गावंडे व सहकाऱ्यांच्या लोकजागर मंच ने पत्रकार दिनी आकोट शहरातील पत्रकारांचा गौरव केला

.हा गौरव सोहळा लोकजागरच्या अकोट कार्यालयात संपन्न झाला.
लोकजागर मंच सारख्या सामाजिक कार्य करीत असलेल्या संघटनेला समाजाभीमुख मांडण्याचे काम पत्रकार मंडळी सातत्याने करीत आली आहे.
त्यासाठी त्यांचे व पत्रकारीतेच्या व्रताचे कौतुक व्हावे यासाठीच पत्रकारदिनाचे औचित्याने अकोट शहरातील पत्रकार बंधुंचा कार्यगौरव व कौतुक सोहळ्याचे आयोजन स्थानीक लोकजागर मंच संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्व पत्रकारांचे लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच याप्रसंगी पत्रकारांना समाजसुधारकांचे चित्र असणारी सुंदर कोलाज पेंटींग फ्रेम भेट स्वरुपात दिली. यावेळी सरचिटणीस अनंतराव सपकाळ यांनी पत्रकारांच्या कार्याप्रती विचार व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्य गौरवा सोहळ्यास शहरातील अनेक पत्रकार हजर होते.

कार्यक्रमाला लोकजागर मंचचे राजेश गावंडे, सूरज शेंडोकार, आकाश बरेठिया योगेश जायले, अर्जुन गाळखे, अमित डोबाळे, मयूर भगत, श्याम पाथ्रीकर, श्रीजीत गडम,रौनक जयस्वाल,आनंद रोडे पाटील, मुजाहिद खान, राजू मानकर, गणेश गडम,अभिजीत कोकाटे, अक्षय मामनकर,शुभम राऊत, चेतन गुरेकार,शाम लटकुटे,अक्षय मोकाशे, केशव लोखंडे, शाम राठी आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थीत होते.