कडेगांवमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक

Google search engine
Google search engine

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पुर्व तयारीचा भाग म्हणुन निवडणुक आयोगाने लोकांमध्ये ईव्हीएम व व्ही व्ही पॅट यंत्राबाबत व निवडणुक प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहीम कडेगांव मध्ये छ.शिवाजी चौक येथे कडेगांव च्या तहसिलदार अर्चना शेटे यांच्या अध्यक्षतेखाली या यंत्राचे प्रात्यक्षित करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरिक श्रीनिवास कराडकर,लक्ष्मण डांगे,वसंतराव गायकवाड,बी के गायकवाड, आनंदराव रास्कर नगरसेवक नितिन शिंदे,मानव परदेशी,ज्ञानेश्वर शिंदे,विजय गायकवाड,संतोष डांगे,सुनिल मोहीते मंडल अधिकारी करांडे साहेब,,तलाठी सचिन कांबळे,बाळासाहेब मिसाळआयटीआय निदेशक भांबुरे,गोसावी साहेब यांच्या सह कडेगांव येथील महीला नागरीक उपस्थित राहुन या प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन मतदान केले त्यांनी केलेले मतदान हे त्याच उमेदवाराला झाले आहे का याची खात्री करून घेतली.तत्पुर्वी तहसिलदार अर्चना शेटे यांनी या सर्व महीला व नागरीकांना या यंत्राची माहिती देताना सांगितले की आगामी निवडणुकीत कडेगांव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचा वापरण्यात येणार आहे.मतदारांनी केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारी मतदानाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे.असे सांगीतले.